आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपविर ने लग्नात स्वीकारली नाही कोणतीही भेटवस्तु सर्वांना मात्र दिले रिटर्न गिफ्ट ... पाहुण्यांना तर मिळाल्या स्वतः लिहलेल्या कार्डबरोबर आणखी 3 गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग २१ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथून लग्नाचे पहिले रिसेप्शन आटोपून मुंबईस परतले.परतल्यानंतर आता २८ नोव्हेंबर रोजी दुसरे तर १ डीसेम्बर रोजी त्यांचे तिसरे रिसेप्शन मुंबई येथे होणार आहे. रिसेप्शन दरम्यान या दोघांनी इटलीतील त्यांच्या पाहुण्यांना दिलेल्या थँक्स गिव्हिंग गिफ्टचा एक फोटो सर्वांसमोर आलायं. यामध्ये दीपिका-रणवीर यांच्या मंडपातील विधींचा फोटो फ्रेम करून पाहुण्यांना भेट देण्यात आला.तर याव्यतिरिक्त मिठाई, हॅण्डमेड बांगड्या, आणि या दोघांनी स्वतःच्या हाताने लिहलेलं एक कार्ड देखील देण्यात आलं. त्याचबरोबर या दोघांनी लग्नसमारंभात आणि रिसेप्शन साठी येणाऱ्या पाहुण्यांना कोणतेही गिफ्ट आणू नका अशी विनंती देखील केली होती.जर तुम्हाला गिफ्ट देण्याची मनोमन इच्छा असेल तर 'द लिव लव्ह लाफ फाऊंडेशन' या संस्थेला द्यावे आम्ही दोघेही या संस्थेशी जोडलेले आहोत.

 

मार्चमध्ये होईल दीपिकाचे कमबॅक ....
- तिनही  रिसेप्शन झाल्यांनतर दोघे आपल्या करिअरवर लक्ष  देणार आहेत. रणवीर आगामी चित्रपट सिंबाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असेल तर दीपिका लग्नानंतर मार्च २००९ मध्ये नव्याने सुरवात करेल.
- दीपिका मेघना गुलाजार यांच्या लक्ष्मी अग्रवालवर आधारित चित्रपाटात लीड रोल करणार आहे. या चित्रपटाची शुटिंग मार्च २०१९ पासून सुरु होईल स्वतः मेघना गुलजार यांनी यास दुजोरा दिला आहे.
- जानेवारी २०१८ मध्ये 'पद्मावत' रिलीज झाल्यांनतर या प्रोजेक्ट बाबद तशी अंउन्समेंट देखील करण्यात अली होती.


दिपवीरने लग्नात केला होता शाही शूजचा वापर...
- दीपिका आणि रणवीरने लग्नसमारंभात सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलेले आऊटफिट परिधान केले होते.
- सब्यसाचीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोघांच्या शूजचे फोटो देखील शेअर केले आहेत.तिने त्यावर गोल्ड थ्रेड एंड स्टोन चे वर्क करून त्याला एकदम ट्रेडिशनल टच दिला होता.
- विशेष बाब म्हणजे सब्यसाचीने फ्रांस चे सुप्रसिद्ध फुटवेअर डिझाइनर Christian Louboutin यांच्या मदतिने हे डिझाईन तयार केले होते. 

 

दीपिकाने लग्नात परिधान केली होती आईने दिलेली साडी....
- दीपिका आणि रणवीर दोघेही बेंगळूर येथे पार पडलेल्या पहिल्या रिसेप्शन मध्ये अगदी शाही थाटात दिसले. दीपिकाने लग्न प्रसंगी आईने म्हणजेच उज्वला पदुकोण यांनी दिलेली साडीच परिधान केली होती.
-रिसेप्शन असो अथवा लग्नसमारंभ दीपिकाने आईने दिलेलीच साडी प्रत्येक विधींसाठी परिधान केली होती. सब्यसाचीने सांगितले होते की दीपिकाची साडी देखील मीच डिझाईन केलेली आहे. सत्य समोर आल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यास सुरवात केली.
- दीपिकाच्या आईने बेंगळुरू येथील अनगाडी गॅलरी बुटीक मधून मुलीच्या लग्नासाठी साडी खरेदी केली होती. १४ नोव्हेंबर रोजी कोकणी पद्धतीने  झालेल्या लग्नात देखील दीपिकाने आईने दिलेली साडीच परिधान केली होती. केवळ काही प्रमाणात त्यात बदल करण्यासाठी तिने साडी डिझाइनार कडे दिली होती.
- नंतर डिझाइनरने या साडीबरोबर फोटो काढून ते शेअर केले आणि स्वतः डिझाईन केल्याचा दावा केला. झालेल्या चुकीबद्दल त्यांनी सोशल मीडियावर माफी देखील मागितली.
- दीपिकाने रिसेप्शन मध्ये देखील आईने भेट केलेली साडीच परिधान केली होती डिझाइनर ने त्यात फक्त काहीप्रमाणात बदल केले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...