आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीरसोबत माहेरी पोहोचली दीपिका, सासु-सास-यांनी केले जावयाचे स्वागत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. दीपिका पदुकोण पती रणवीरला घेऊन आपल्या माहेरी पोहोचली आहे. तिच्या होमटाउनमध्ये चाहत्यांनी दोघांचे स्वागत केले. तर दूसरीकडे जावई रणवीरचे पत्नीच्या माहेरी विशेष वेलकम करण्यात आले. इटलीमध्ये लग्न केल्यानंतर दीपिका-रणवीर मुंबईत परतले होते. मंगळवारी दोघंही बेंगळुरुत पोहोचले. येथे दोघांच्या लग्नाचे एक ग्रँड रिसेप्शन हॉटेल लीला पॅलेसमध्ये ऑर्गनाइज करण्यात आले आहे. 


21 नोव्हेंबरला होणार रिसेप्शन 
बेंगळुरुमध्ये पोहोचल्यानंतर दीपिका-रणवीरचे एयरपोर्टवर स्वागत झाले. चाहत्यांनी दोघांना चारही बाजूने घेराव घातला. चाहते आणि फोटोग्राफर या दोघांचे फोटो काढत राहिले. हे दोघं पदुकोण हाउसमध्ये पोहोचल्यानंतर तिथेही चाहत्यांची गर्दी होती. दोघांनी घराच्या बालकनीतून चाहत्यांचे आभार मानले. पहिल्यांदा सासरी गेलेल्या रणवीरचे सासरी स्वागत करण्यात आले. दीपिकाचे आई-वडील उज्ज्वला आणि प्रकाश पदुकोण यांनी जावयाचे टिका लावून स्वागत केले. 

 

फोटोग्राफर्सने दीपिकाला भाभीजी म्हणून हाक मारली 
दीपिका-रणवीर मुंबई एयरपोर्टवरुन बेंगळुरुला रवाना झाले होते, त्या दरम्यान दोघांनी फोटोग्राफर्सला पोज दिल्या. पोज देताना फोटोग्राफर्सने दीपिकाला भाभीजी म्हणून हाक मारली. स्वतःला भाभी म्हटल्यानंतर दीपिला हसू टाळू शकली नाही. 

 

मंगळसूत्रात आहेत 3 डायमंड सोलिटेयर 
वृत्तांनुसार सोनम कपूरप्रमाणेच दीपिकाचे मंगळसूत्रही कस्टमाइज्ड आहे. हे रणवीर सिंहने गिफ्ट केले आहे. मंगळसूत्रामध्ये फ्लोरल पॅटर्नमध्ये 3 डायमंड सोलिटेयर आहेत. 

 

2 ग्रँड रिसेप्शन होणार 
21 नोव्हेंबरला बेंगळुरुच्या द लीला पॅलेस हॉटेलमध्ये दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन आहे. यामध्ये दोन्ही फॅमिलीचे जवळचे नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित करण्यात आले आहे. यानंतर 28 नोव्हेंबरला मुंबईमध्ये अजून एक रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. हे रणवीरचे पालक होस्ट करणार आहेत. बॉलिवूड सेलेब्स आणि दूस-या फिल्डचे लोकही यावेळी उपस्थित असणार आहेत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...