आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. दीपिका-रणवीरचे फर्स्ट रिसेप्शन बुधवारी 21 नोव्हेंबरला 'द लीला पॅलेस' हॉटेलमध्ये बेंगळुरुत झाले. रिसेप्शनचे इनसाइड फोटोज समोर आले आहेत. यामध्ये दीपवीर नातेवाईकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. रणवीर एका फोटोमध्ये पत्नीला डोळा मारताना दिसत आहे तर पत्नी दीपिका यावर खळखळून हसताना दिसतेय. फोटोमध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे, सर्व फोटोमध्ये रणवीरने दीपिकाचा हात पकडलेला आहे. यावेळी पत्नीच्या साडीचा पदर सांभाळतानाही दिसला. दीपिका गोल्डन रंगाच्या कांजीवरम साडीमध्ये सुंदर दिसत होती, तर रणवीर ब्लॅक आणि गोल्डन रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. ओव्हरऑल लूकविषयी बोलायचे तर दीपिकाने हेवी ग्रीन स्टोरनचा नेकलेस, ईयररिंग्स आणि लाल चूडा घातला होता. तिने भांगेत सिंदूर आणि गजरा लावून आपला लूक कम्प्लीट केला.
आईसोबत दिसली दीपिका
- रिसेप्शनच्या अनसीन फोटोजमध्ये दीपिका आई उज्ज्वला पादुकोणसोबत पोज देताना दिसली. आई-लेकीची बॉन्टिंग या फोटोमध्ये दिसतेय.
- दीपिकाप्रमाणेच आई उज्ज्वलानेही कांजीवरम साडी नेसली होती. उज्ज्वलाने रिसेप्शनमध्ये रेड अँड गोल्डन बूट्टयांची हेवी साडी नेसली होती, यामध्ये त्या गॉर्जियस दिसत होत्या.
- हॉटल द लीला पॅलेसमधील पार्टी दीपिकाच्या पालकांनी होस्ट केली होती. पार्टीमध्ये अनिल कुंबळे पत्नीसोबत दिसले, तर शटलर पीव्ही सिंदुसोबतच बेंगळुरुचे अनेक दिग्गज सहभागी झाले.
सिंगल फोटोसाठी रणवीरने दिला स्पष्ट नकार
- काही फोटोग्राफर्सने सोलो फोटोची मागणी केली, तेव्हा रणवीरने स्पष्ट नकार दिला. रणवीर फोटोग्राफर्सला म्हणाला "मियां बीवीसोबत आहेत, तर फोटो वेगळा का?"
- तर स्टेजवर उभी दिपिकाने पती रणवीरला या पॉझिटिव्ह आणि पजेसिव्ह अॅटीट्यूडसाठी फ्लाइंग किस दिली.
दीपवीरच्या लग्नाचे अजून 2 ग्रँड रिसेप्शन होतील
- 21 नोव्हेंबरला बेंगलुरु रिसेप्शननंतर 28 नोव्हेंबरला रणवीरचे पालक एक रिसेप्शन होस्ट करणार आहेत. हे रिसेप्शन रणवीरचे कुटूंब, फ्रेंड्स, मीडिया आणि जवळच्या नातेवाईकांसाठी असणार आहे.
- यानंतर मुंबईमध्ये 1 डिसेंबरला ग्रँड रिसेप्शन असणार आहे. हे रिसेप्सन द ग्रँड हयात हॉटेलमध्ये रात्री 9 वाजता सुरु होईल. या पार्टीमध्ये बॉलिवूड स्टार्स उपस्थित असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.