आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranveer Singh Deepika Padukone Weird Clause For Guests Invited For Their Wedding

दीपिका-रणवीरच्या लग्नात येणा-या पाहुण्यांना मान्य करावी लागणार ही एक अट, तरच मिळेल लग्नस्थळी प्रवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. दोघे यावर्षी 20 नोव्हेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघांच्या लग्नासंदर्भातील एक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे कदाचित चाहत्यांची निराशा होऊ शकते. बातम्यांनुसार, चाहत्यांना दोघांच्या लग्नाचे फोटोज लगेचेच बघायला मिळणार नाहीत. याचे कारण म्हणजे लग्नात येणा-या पाहुण्यांना लग्नस्थळी मोबाइल फोन वापरण्याची परवानगी देण्यात येणार नाहीये. ही अट मान्य असल्यास पाहुण्यांना लग्नस्थळी प्रवेश दिला जाणार आहे. बातम्यांनुसार, लग्नाचे फोटोज समोर येऊ नये, यासाठी ही अट ठेवण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच अभिनेते कबीर बेटी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दीपिका-रणवीरला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी ट्वीट केले होते, 'अतिशय सुंदर कपल आणि इटलीतील सुंदर लोकेशन.. अतिशय भव्य असा हा इव्हेंट असेल. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांना खूप खूप शुभेच्छा. दोघांना आयुष्यभर आनंद मिळो.' 

 

इटलीत होणार आहे लग्न...
 - यावर्षाच्या सुरुवातीपासूनच रणवीर आणि दीपिका यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरु होती. तेव्हापासूनच हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेही म्हटले जाऊ लागले. 
- दीपिका आणि रणवीर यांचा साखरपुडा याचवर्षी श्रीलंकेत झाला. येथे दोघे सुटी एन्जॉय करायला गेले होते. 

- लग्नानंतर अभिनय सोडून कुटुंबाला प्राधान्य देणार असल्याचे दीपिका पदुकोणने एका मुलाखतीत म्हटले होते.  

 

लग्नात सहभागी होतील एवढे पाहुणे...
दीपिका आणि रणवीरच्या लग्नात दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. पाहुण्यांची यादी फक्त 30 जणांची असून त्यांचे लग्न इटलीतील लेक कोमो येथे होणार आहे. हे रणवीर आणि दीपिकाचे आवडते ठिकाण आहे. लग्नानंतर रणवीर आणि दीपिका मुंबई आणि दीपिकाचे होमटाऊन असलेल्या बंगळूरु येथे वेडिंग रिसेप्शन देणार आहेत.

 

 

बातम्या आणखी आहेत...