आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Engagement मध्ये सर्वांसमोर रणवीरने दीपिकाला मागितली Kiss, दीपिका म्हणाली-देईल पण एका अटीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - दीपिका पदुकोण-रणवीर सिंग यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. साखरपुडा, संगीत, मेंदीनंतर बुधवारी दोघे कोंकणी पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकतील. रणवीरने मेंदी लागल्यानंतर दीपिकाला बराच त्रास दिल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे. रणवीरने सर्वांसमोरच दीपिकाला किस मागितली. दीपिका त्यावर त्याला म्हणाली आधी मला जेवण भरव. 


रणवीरचे शब्द ऐकूण दीपिका झाली भावून 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार मेंदी सेरेमनीत रणवीरने एक स्पीच दिले. ते ऐकूण दीपिका इमोशनल झाली होती. तिला रडताना पाहून रणवीरने तिला मिठी मारली. दीपिकाच्या हातात मेंदी लावलेली असल्याने तिने रणवीरला जेवण भरवण्यास सांगितले. त्यावर रणवीर सर्वांसमोर म्हणाला, की आधी त्याला किस पाहिजे मग तो तिला भरवणार. दीपिकाही त्याला म्हणाली आधी जेवण भरव मगच किस देते. 


Kiss मुळेच समोर आले होते अफेयर 
दीपिका-रणवीरने 2013 मघ्ये 'गोलियों की रासलीला रामलीला' मध्ये सर्वात आधी स्क्रीन शेअर केले होते. पहिल्याच चित्रपटात त्यांची केमिस्ट्री जबरदस्त होती. क्रू मेंबरने सांगितले की, दोघांमध्ये काहीतरी शिजतंय हे सर्वांना तेव्हाच कळले होते. पण 'अंग लगा दे...' गाण्यातील किस पाहिल्यानंतर तर त्यांच्यात अफेयर असल्याचे कनफर्म झाल्याचे त्याने सांगितले. सेटवर दोघे एकमेकांना बेबी म्हणायचे. एकत्र जेवायचे, गप्पा मारायचे. बराच वेळ दोघे व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसायचे. बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या एका क्रू मेंबरने सेटवर त्या दोघांमधील अफाट प्रेम स्पष्ट दिसत होते, असे सांगितले होते. 


दीपिका रणवीरला म्हणाली होती बेस्ट किसर 
करन जोहरच्या 'कॉफी विथ करण' सिझन 6 च्या पहिल्या भागात दीपिका आणि आलिया गेस्ट होत्या. तेव्हा दीपिकाला करणने विचारले होते की, तिला रणवीरची कोणती गोष्ट आवडते आणि काय आवडत नाही आणि काय सहन करते? त्यावर दीपिकाने म्हटले, रणवीर फार इमोशनल आणि एक्सप्रेसिव्ह आहे हे तिला आवडते आणि त्याचा लाइफस्टाइल पॅटर्न आवडत नाही असे ती म्हणाली होती. रणवीरला बेस्ट किसर समजते असेही ती म्हणाली होती. 


कोंकणी पद्धतीने होणार लग्न 
दीपवीरचे लग्न लग्न बुधवारी कोंकणी पद्धतीने होणार आहे. यावेळी दीपिका व्हाइट आणि गोल्डन कलरची साडी परिधान करेल तर रणवीरही पांढऱ्या आऊटफिटमध्ये दिसेल. दोघांचे ड्रेस डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केले आहेत. गुरुवारी 15 नोव्हेंबरला दोघांचे सिंधी पद्धतीने लग्न होईल. 

बातम्या आणखी आहेत...