आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • रणवीर सिंह, लग्जीरियस लाइफ, कार कलेक्शन, Ranveer Singh Expensive Things Car Collection 1000 Shoes Car Collection

गोव्यात बंगला, मुंबईत 25 कोटींचं घर, जेम्स बाँडवाल्या कारने फिरतो, आतापर्यंत फक्त 13 चित्रपट केले, पण खूप लक्झरियस लाइफ जगतो रणवीर सिंह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोन 15 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही इटलीच्या लेक कोमोमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करतील. रणवीर सिंहला लक्झरी लाइफ जगणे खूप पसंत आहे. रणवीर सिंहची नेटवर्थ 136 कोटी रुपये आहे. आज तुम्हाला सांगत आहोत रणवीर सिंहच्या महागड्या वस्तूंबाबत...

 

गोव्यात बंगला
रणवीरचा गोव्यात एक बंगला आहे, ज्याची किंमत 9 कोटी रुपये आहे. याच्याशिवाय गोरेगाव, मुंबईत त्याचा एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत 10 कोटी रुपये आहे. प्रभादेवी, मुंबईत सी-फेसिंग आणखी एक फ्लॅट आहे, जो त्याने 15 कोटी रुपयांत खरेदी केला होता.


कार कलेक्शन
रणवीरजवळ अनेक उत्तम मॉडल्सच्या कार आहेत. त्याच्याकडे Aston Martin Rapide (3.29 कोटी रुपये), लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग (2.05 कोटी रुपये), जॅग्वार एक्सजेएल (1.07 कोटी रुपये), टोयोटा लँड क्रूज परडो (1.04 कोटी रुपये), मर्सिडीझ बेंझ जीएलएस (83 लाख रुपये), मर्सिडीझ बेंच ई क्लास (70 लाख रुपये), ऑडी क्यू 5 (59.78 लाख रुपये), Maruti Ciaz (10.97 लाख रुपये) अशा कार आहेत. याशिवाय रणवीरजवळ एक व्हिंटेज मोटार सायकल आहे, ज्याची किंमत 6.8 लाख रुपये आहे. तथापि, अॅस्टन मार्टिन जेम्स बॉन्डच्या चित्रपटांत दिसणारी कल्ट कार आहे.


कारच नव्हे, तर बुटांचेही आहे कलेक्शन
रणवीरजवळ कारचे मोठे कलेक्शन आहे, सोबतच महागड्या बुटांचेही कलेक्शन त्याच्याकडे आहे. यात तब्बल एक हजार बूटं आहेत, यांची किंमत 68 लाख रुपये आहे.

- तथापि, अपकमिंग चित्रपट सिंबाचे डायरेक्टर रोहिट शेट्टीने त्यांना तब्बल 5 लाख रुपयांची फॅनी घडी भेटस्वरूपात दिली आहे.


8 वर्षांच्या करिअरमध्ये केले 13 चित्रपटांत काम
रणवीर सिंहने आपल्या 8 वर्षांच्या करिअरमध्ये फक्त 13 चित्रपटांत काम केले आहे. त्याने 2010 मध्ये आलेल्या 'बँड बाजा बारात'मधून डेब्यू केले होते. याशिवाय त्याने 'लेडीज व्हर्सेस रिकी बहल', 'रामलीला', 'गुंडे', 'दिल धडकने दो', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' यासारख्या चित्रपटांत काम केले आहे. त्याचे अपकमिंग मूव्ही सिंबा आणि गली बॉय आहेत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...