आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीरच्या 'सिम्बा'ने 15 दिवसात बनवले 8 मोठे रेकॉर्ड, 2018 मध्ये 200 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणारा तिसरा चित्रपट बनला सिम्बा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. रणवीर सिंहच्या 'सिम्बा' चित्रपटाने 15 दिवसातच बॉक्सऑफिसवर जवळपास 214 कोटींची कमाई केली आहे. 2018 हे वर्ष रणवीरसाठी शानदार ठरले. वर्षांच्या सुरुवातीलाच रणवीरच्या 'पद्मावत' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती, तर वर्षांच्या अखेरीच त्याच्या 'सिम्बा' चित्रपट बॉक्सऑफिसवर धमाल करतोय. सिम्बाने रिलीजच्या अवघ्या 15 दिवसातच बॉलिवूडचे 8 मोठे रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. 

 

रेकॉर्ड नंबर 1 : रणबीरचा दूसरा सर्वात मोठा चित्रपट 
'सिम्बा' रणवीरचा दूसरा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट बनला आहे. यापुर्वी 2018 मध्ये आलेल्या 'पद्मावत' या रणवीरच्या चित्रपटाने सर्वात जास्त कमाई केली होती. 'पद्मावत'ने 300 कोटींचा बिझनेस केला होता, तर सिम्बानेही आतापर्यंत 200 कोटी कमावले आहे. 

 

रेकॉर्ड नंबर 2 : रोहित शेट्टीचा तिसरा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट 
डायरेक्टर रोहित शेट्टीसाठी 'सिम्बा' हा त्यांचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट बनला आहे. या चित्रपटाने रोहितच्या मागच्या चित्रपटांना 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 'गोलमाल अगेन' ला मागे टाकले आहे. 'चेन्नई एक्सप्रेस'ने 2017 कोटींची कमाई केली होती, तर 'गोलमाल अगेन'ने 205 कोटींचा गल्ला जमवला होता. 

 

रेकॉर्ड नंबर 3 : रोहित शेट्टीचा 8 वा 100 कोटींचा चित्रपट 
'सिम्बा' रोहित शेट्टीचा 8 वा असा चित्रपट आहे, ज्याने 100 कोटींची कमाई केली आहे. ते बॉलिवूडचे एकमेव असे डायरेक्टर आहे, ज्यांच्या 8 चित्रपटांनी 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सिम्बापुर्वी रोहितच्या 'गोलमाल फन अनलिमिटेड' गोलमाल रिटर्न्स, गोलमाल 3, सिंघम, चेन्नई एक्सप्रेस, सिंघम रिटर्न्स आणि गोलमाल अगेन सारख्या चित्रपटांनी या क्लबमध्ये समावेश केला आहे. 

 

रेकॉर्ड नंबर 4 : एकट्याच्या दमावर रणबीरचा सर्वात यशस्वी चित्रपट 
रणवीरच्या चित्रपटांनी यापुर्वीही बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली आहे. परंतु ते पुर्णपणे रणवीरचे चित्रपट नव्हते. रणवीरच्या मोठ्या चित्रपटांमध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोण होती आणि तिलाही चित्रपटाच्या कमाईचे क्रेडिट देण्यात आले होते. पण 'सिम्बा' पुर्णपणे रणवीरचा चित्रपट आहे. यामध्ये अभिनेत्री सारा अली खान आहे. पण तिची भूमिका खुप छोटी होती. यामुळे रणबीरने आपल्या दमावर सर्वात जास्त कमाई करणाचा चित्रपट आहे. 

 

रेकॉर्ड नंबर 5 : 2018 मध्ये 100 कोटी कमावणारा 13 चित्रपट 
2018 हे वर्ष बॉक्सऑफिससाठी धमाकेदार ठरले.  ‘संजू’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘राज़ी’, ‘स्त्री’ आणि ‘बधाई हो’ सारख्या चित्रपटांनी 100 कोटींचा आकडा आरामात पार केला. 'सिम्बा' 2018 चा 13 वा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला.

 

रेकॉर्ड नंबर 6 : 2018 मध्ये 200 कोटी कमावणारा तिसरा चित्रपट बनला 
2018 मध्ये तीन चित्रपटांनी 200 कोटींचा आकडा पार केला. यामध्ये सिम्बाही आहे. इतर दोन चित्रपटांमध्ये रणवीर सिंहचा 'पद्मावत' आणि रणबीर कपूरचा 'संजू' हा चित्रपट आहे. 

 

रेकॉर्ड नंबर 7 : रणबीरचा पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट 
'सिम्बा' चित्रपटाने पहिल्या दिवशी 20.72 कोटींची कमाई केली. यापुर्वी रणवीरच्या 'पद्मावत' चित्रपटाने पहिल्या दिवशी 19 कोटींची कमाई केली होती. या हिशोबाने सिम्बा रणवीरचा पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणाचा चित्रपट आहे. 

 

रेकॉर्ड नंबर 8 : सारा अली खानचा सर्वात मोठा चित्रपट 
सारा अली खानने नुकताच 'केदारनाथ' चित्रपटाने डेब्यू केला. 'सिम्बा'मध्ये तिची भूमिका कमी असली, तरी करिअरच्या सुरुवातीचाल 200 कोटी कमाई करणारा हा तिचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा भाग असणे सारासाठी खुप महत्त्वाचे आहे. 

बातम्या आणखी आहेत...