आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranveer Father Jagjit Singh Bhavnani Welcome Daughter In Law Deepika In Unique Style: Ranveer Singh Gold Ring Gifted By Bride Family

रणवीरला सासरच्या मंडळींनी दिली सोन्याची अंगठी तर दीपिकाने लग्नात घातली रणवीरने दिलेली महागडी डायमंड रिंग, एका फोटोत नवरीच्या हातात दिसले कपडे, फुलं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाचे दोन फोटोज समोर आले आहेत. स्वतः रणवीर आणि दीपिका यांनी ते सोशल मीडियावरुन चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. सिंधी पद्धतीने झालेल्या लग्नात रणवीनरे लाल साफा आणि गोल्डन शेरवानी परिधान केली आहे. तर दीपिकाने गोल्डन वर्क असलेला लाल जोडा घातला आहेत. शिवाय हेवी ज्वेलरीसोबत हातात कलीरें घातले आहेत. या नवदाम्पत्याचे वेडिंग आउटफिट सब्यसाचीने डिझाइन केले आहेत. दोघांनीही हेवी ज्वेलरी घातलेली दिसतेय. तर कोकणी पद्धतीने झालेल्या लग्नाचा फोटोही इंट्रेस्टिंग आहे. रणवीरच्या हातात ज्वेलरी दिसतेय. दीपिकाच्या हातात कपडे आणि चार भांडी दिसत आहेत. या फोटोत कोकणी पद्धतीच्या लग्नाची एक विधी झालेली दिसतेय. या विधीला  ‘सुनमुख’ असे म्हटले जाते. या विधीत सासरची मंडळी नववधूला भेटवस्तू देत असतात. रणवीरने मुंडावळीही बांधलेली दिसतेय. रणवीरला दीपिकाच्या कुटुंबीयांनी एक सोन्याची अंगठी गिफ्ट केली. तर दीपिकाच्या हातातील डायमंड रिंग ही स्क्वेअर शेपची आहे.  सहसा राऊंड शेपची डायमंड रिंग बघितली जाते. ही सिंगल सोलिटेअर स्क्वेअर डायमंड रिंग अतिशय महागडी आहे. दीपिका-रणवीरचे बुधवारी कोकणी पद्धतीने तर गुरुवारी सिंधी पद्धतीने लग्न झाले. 

 

सास-यांनी केले सून दीपिकाचे खास वेलकम... 

- लग्नानंतर रणवीरचे वडील जगजीत सिंह भवनानी यांनी खास अंदाजात आपल्या सूनेचे स्वागत केले. जगजीत सिंह यांनी दीपिकाचे स्वागत करताना म्हटले, "ही दीवानी तर भवनानी झाली..." या खास वेलकमची माहिती रणवीरची स्टायलिस्ट निताशा गौरव हिने सोशल मीडियावरुन दिली. 


- दुसरीकडे दीपिकाचा चुलत भाऊ अमित पदुकोणने ट्वीटरवरुन रणवीरच्या कुटुंबीयांचे वेलकम केले. शुभेच्छा देताना अमितने लिहिले, ''हा एक जादुई आठवडा आहे, प्रेमात बुडालेला.  तुम्हा दोन सुंदर आणि चांगल्या व्यक्तींचे मिलन एखाद्या परिकथेसारखे आहे. रणवीर तुझे आमच्या कुटुंबात स्वागत आहे. कुटुंबात सर्वात फिल्मी असल्याचा मान आता तू माझ्याकडून हिसकावून घेतला आहे. चल काही हरकत नाही... दीपिका तुला एवढे आनंदी मी यापूर्वी कधी पाहिले नाही. ''

 

नववधुला रणवीरच्या कुटुंबीयांनी दिली खास ओढणी...
- दीपिकाने लग्नात लाल जोड्यासोबत एक खास ओढणी कॅरी केली आहे. ही ओढणी रणवीरच्या कुटुंबीयांनी दीपिकाला दिली. यावर 'सदा सौभाग्यवती भव' असे लिहिले आहे. 
- सिंधी लग्नात नवरदेवाकडील महिला नववधुला फुलांचे दागिने घालतात. त्यानंतर नववधूची कुटुंबीयांसोबत ओखळ करुन दिली जाते. 

 

हळदीपासून सुरु होतात सिंधी लग्नाच्या विधी...

- वर-वधुला हळद लागल्यानंतर सिंधी लग्नातील विधीला सुरुवात होते. ‘घरी पूजन’ आणि ‘खीरम सत’ या दोन खास विधी असतात. घरी पूजनमध्ये वर आणि वधुचे हात पीठाने माखले जातात. तर खीरम सत विधीवेळी कच्च्या दुधाने इष्टदेवाची पुजाअर्चा केली जाते. त्यानंतर ते दुध प्रसाद म्हणून वाटले जाते.

 

लग्नानंतर होणार आहेत दोन रिसेप्शन...

- 18 नोव्हेंबर रोजी रणवीर आणि दीपिका इटलीहून भारतात परतणार आहेत. त्यांचे पहिले वेडिंग रिसेप्शन 21 नोव्हेंबर रोजी बंगळुरु येथे पार पडणार आहे. तर दुसरे रिसेप्शन 28 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार असून यामध्ये बॉलिवूडचे सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत.  

बातम्या आणखी आहेत...