आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या अभिनेत्रीसोबत दीपिकाचे अजिबात पटत नाही तिला पती रणवीरने दिले रिसेप्शनचे आमंत्रण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. दीपिका-रणवीरच्या लग्नानंतर त्यांच्या रिसेप्शन पार्टी सध्या सुरु आहेत. बुधवारी मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये रिसेप्शन झाल्यानंतर 1 डिसेंबरला बॉलिवूड सेलेब्ससाठी रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रिसेप्शनमध्ये दीपिकाची कट्टर शत्रू मानली जाणारी कतरिना कैफही पोहोचणार आहे. कतरिना सध्या दिल्लीमध्ये सलमानसोबत 'भारत' चित्रपटाची शूटिंग करत आहे. हे चित्रपटाचे महत्त्वाचे शेड्यूल आणि आणि कतरिना यामधून ब्रेक घेऊन दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये मुंबईत येणार आहे. 


दीपिकाने नाही, तिच्या पतीने दिले आमंत्रण
सूत्रांनुसार, दीपिका आणि कतरिना आता फ्रेंड नाही. कारण रणबीर कपूरने दीपिकासोबत ब्रेकअप केल्यानंतर लगेच कतरिनाला डेट करणे सुरु केले होते. यामुळे दीपिका आणि कतरिनामध्ये वाद आहे आणि दोघी एकमेकींच्या शत्रू आहेत. पण दीपिका आणि रणबीर आता फ्रेंड्स आहेत. रणबीरलाही रिसेप्शनचे आमंत्रण देण्यात आले आहे. तो या पार्टीमध्ये आलियासोबत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. कारण सोनमच्या लग्नातही हे दोघं एकत्र पोहोचले होते. तर कतरिना आणि तिची बहीण इजाबेलला रणवीर सिंहकडून आमंत्रण देण्यात आले आहे. यामुळे कतरिना धाकट्या बहिणीसोबत पार्टी अटेंड करु शकते. ती सध्या 'भारत'ची शूटिंग करत आहे, तर तिला शूटिंगमधून ब्रेक घ्यावा लागेल. तिचा को-स्टार सलमान खानही बिग बॉसच्या शूटिंगसाठी मुंबईमध्ये येणार आहे. पण याविषयी अजून क्लियरटी नाही. दीपिका आणि रणवीने आतापर्यंत दोन रिसेप्शन दिले आहे. पहिले रिसेप्शन बेंगळुरुमध्ये तर दूसरे रिसेप्शन मुंबईमध्ये झाले आहे.

 

कतरिनाने दिल्या होत्या शुभेच्छा...
रणवीर आणि दीपिकाने आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला होता तेव्हा कतरिनाने कमेंटमध्ये शुभेच्छा दिल्या होत्या. कतरिनाने लिहिले होते की, 'तुम्हा दोघांना वैवाहिक जीवनाच्या खुप खुप शुभेच्छा'... कतरिना आणि दीपिकाचे शत्रूत्व आता मैत्रीमध्ये बदलणार असे या शुभेच्छांच्या मॅसेजवरुन दिसते.

 

 

बातम्या आणखी आहेत...