आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पांड्यानंतर आता रणवीर सिंहचाही व्हिडीओ झाला व्हायरल, करण जोहरच्या चॅट शोमध्ये करीना कपूरसाठी केले होते आक्षेपार्ह कमेन्ट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : करण जोहरच्या चॅट शोमध्ये क्रिकेटर हार्दिक पांड्यानंतर आता रणवीर सिंहसुद्धा आपल्या एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. रणवीर सिंहने ही कमेंट काही वर्षांपूर्वी 'कॉफी विद करन' सीजन 3 मध्ये दिले होते. या एपिसोडच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणवीर, करीना कपूरबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहे. या एपिसोडमध्ये रणवीरसोबत अनुष्का शर्माही होती. 

 

करीनाला स्विम करताना पाहून मी मुलापासून पुरुष झालो...
शोचा होस्ट करण जोहर रणवीरला त्याच्या अफेयर्सबद्दल एकही प्रश्न विचारत होता. याच्या उत्तरादाखल रणवीरने करीना कपूरशी निगडित एक किस्सा सांगितलं. रणवीर  म्हणाला, ''जेव्हा मी लहान होतो तेव्हा स्विमिंग क्लबला जात होतो. त्याच क्लबमध्ये करीना कपूरही यायची. करीना कपूरला स्विम करतांना पाहून मी मुलापासून पुरुष झालो''. रणवीरचे हे कमेंट ऐकून अनुष्का शर्मा आणि करण जोहर दोघे शॉक होतात. यांनतर करण जोहर रणवीरच्या या कमेंटवर म्हणतो, 'करीना माझ्या बहिणीसारखी आहे, तुझ्या अशा बोलण्यामुळे मी नाराजही होऊ शकतो. तसेच अनुष्का शर्माही रणवीरला डर्टी बॉय म्हणते. पण रणवीर म्हणतो मी तर खरे खरे सांगितले. 

 

रणवीरशी नाराज आहेत सोशल मीडिया यूजर्स...
रणवीरचा हा व्हिडीओ पहिल्यांनंतर फॅन्स अत्यंत नाराज आहेत. मात्र नंतर रणवीर सिंह ला आपल्या या कमेंटचा पश्चात्तापही झाला. रणवीर जेव्हा 'कॉफी विद करण' च्या पुढच्या एपिसोडमध्ये आला तेव्हा तो म्हणाला, ''मी खूप घाबरलेला आणि नर्वस आहे. मागचा माझ्यासाठी एपिसोड डिजास्टर होता''

 

बातम्या आणखी आहेत...