आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एन्टटेन्मेंट डेस्क. रणवीर सिंहचा सिम्बा चित्रपट बॉक्सऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय. चित्रपटाने 4 दिवसात 96.35 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांच्यानुसार हा चित्रपट लवकरच 100 कोटींचा आकडा पार करणार आहे. रणवीरने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अवघे 14 चित्रपट चित्रपट केले आहे. तरीही तो खुप लग्जीरियस आयुष्य जगतो. त्याच्याजवळ कोट्यावधींचे बंगले आणि कार कलेक्शन आहे.
आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत रणवीर सिंहच्या महागड्या वस्तूंविषयी...
मुंबईमध्ये बंगले
रणवीरचा गोव्यात बंगला आहे. याची किंमत 9 कोटी रुपये आहे. यासोबतच गोरेगाव, मुंबईमध्ये त्याचा एक फ्लॅट आहे, याची किंमत 10 कोटी आहे. प्रभादेवी, मुंबईमध्ये सी-फेसिंग एक फ्लॅट आहे, हे त्याने 15 कोटींमध्ये खरेदी केले होते. दीपिका पदुकोणसोबत लग्न केल्यानंतर दीपवीरने मुंबईमध्ये एक 50 कोटींचा बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याच्या रिनोवेशनचे काम सध्या सुरु आहे. लवकरच हे दोघं या बंगल्यामध्ये शिफ्ट होतील.
कार कलेक्शन
रणवीरजवळ अनेक चांगल्या मॉडल्सच्या कार आहेत. त्याच्याजवळ Aston Martin Rapide (3.29 कोटी रुपये), लँड रोवर रेंज रोवर वोग (2.05 कोटी रुपय), जगुआर एक्सजेएल (1.07 कोटी रुपये), टोयेटा लँड क्रूज परडो (1.04 कोटी रुपये), मर्सिडीज बेंच जीलेएस (83 लाख रुपये), मर्सिडीज बेंच ई क्लास (70 लाख रुपय), ऑडी क्यू 5 (59.78 लाख रुपये), Maruti Ciaz (10.97 लाख रुपए) या कार आहेत. यासोबतच रणवीरजवळ एक विंटेज मोटर सायकल आहे, याची किंमत 6.8 लाख रुपये आहे. यासोबतच एस्टन मार्टिन जेम्स बॉन्डच्या चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणार कल्ट कार आहे.
फक्त कार नाही तर शूजचेही कलेक्शन
रणवीरजवळ कारचे चांगले कलेक्शन आहे. यासोबतच त्याच्याकडे शूजचेही कलेक्शन आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये जवळपास एक हजार शूज आहेत, याची किंमत 68 लाख रुपये आहे. तर सिम्बा चित्रपटाचा डायरेक्टर रोहित शेट्टीने त्याला जवळपास 5 लाख रुपयांची फॅनी घड्याळही गिफ्ट दिली आहे.
8 वर्षात केले 14 चित्रपटांमध्ये काम
रणवीर सिंहने आपल्या 8 वर्षांच्या करिअरमध्ये 14 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने 2010 मध्ये आलेल्या 'बँड बाजा बरात' मधून डेब्यू केला होता. यासोबतच त्याने 'लेंडीज वर्सेस रिकी बहल'रामलीला', 'गुंडे', 'दिल धड़कने दो', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'सिम्बा' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा अपकमिंग चित्रपट 'गली बॉय' आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.