आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 प्रकारच्या एक्सपर्ट्सच्या मदतीने रणवीर बनला हुबेहूब कपिल देव, कपिलदेव सोबत घालवले 10 दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रणवीर सिंहने आपल्या जन्मदिनी आगामी चित्रपट '83' चा फर्स्ट लुक रिलीज केला. चित्रपटात तो हुबेहूब त्याकाळच्या कपिल देवसारखा दिसत आहे. या चित्रपटासाठी मेकअप, हेअर स्टायलिस्ट, बॉडी ट्रेनर आणि क्रिकेट एक्सपर्ट्सनी कठोर परिश्रम घेतले आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यापूर्वी कपिल देव यांना समजून घेण्यासाठी रणवीर दहा दिवस कपिल देव यांच्या घरी राहिला होता. 


या भूमिकेसाठी रणवीरची निवड करण्यात आली तेव्हा सर्वात अगोदर त्याची उंची कपिल देवच्या उंचीसोबत जुळवून पाहिली होती. रणवीरची उंची (1.77 मी) आणि कपिलदेव ची उंची (1.83 मी)मध्ये फारसा काही फरक जाणवला नाही. रणवीरला या चित्रपटात घेण्यामागे त्याच्या उंची व्यतिरिक्त शरीरयष्टी आणि पंजाबी असणे महत्वाचे कारण होते. 


क्रिकेट आणि गोल्फ एकत्रित खेळले

> कॅरेक्टर पार्ट : रणवीर कपिलसोबत क्रिकेट आणि गोल्फ खेळण्याव्यतिरिक्त सोबत जेवणही करत होते. त्याने कपिल यांचे अनेक जुने व्हिडिओ पाहिले आणि त्यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी अधिक वाचन केले. 


> क्रिकेट पार्ट : कपिलने रणवीरला बॅटींग आणि बॉलिंग दोन्हीही ट्रेनिंग दिली. रणवीरची बॅटींग अगोदरपासून बरीच चांगली होती पण बॉलिंग स्टाइल पकडण्यासाठी त्याला कठोर मेहनत घ्यावी लागली. कपिलने रणवीरला मान आणि पाठीवर जास्त भार देऊन बॉलिंग करणे शिकवले. कपिलची बॉलिंग स्टाइल शिकण्यसाठी रणवीरला आपले बॉडी मेकॅनिक्स बदलावे लागले होते. या संपूर्ण कामात रणवीरच्या मदतीसाठी एक बॉडी कोच देखील आणला होता. 

> बॉडी पार्ट : कपिलसारखी बॉडी बनण्यासाठी रणवीरला एका अॅथेटलेटिक ट्रेनिंग कार्यक्रमात ठेवण्यात आले होते. वरील शरीर अंगाला कपिल देवसारखी रहावी यासाठी रणवीरच्या कार्डिओ आणि पायाच्या व्यायामावर जास्त लक्ष देण्यात आले. 
 

बातम्या आणखी आहेत...