आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ranveer Singh New Film Teaser Launch, Ranveer Gives Fabulous Shots

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Gully Boy teaser : लग्नानंतर पहिल्यांदा फक्त आलियाच नाही अजून एका अभिनेत्रीसोबत लिपलॉक करताना दिसला रणवीर : Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : रणवीर सिंह आणि आलिया भट्‌टची फिल्म 'गली बॉय' टीजर रिलीज झाला आहे. दीड मिनिटांच्या या टीजरमध्ये रणवीरने स्पिटफायरच्या लिरिक्सला आपला आवाज दिला आहे. चित्रपटाची कहाणी स्ट्रीट रॅपर्सवर बेस्ड आहे. यामध्ये रणवीरचे नाव मुराद आहे आणि आलियाच्या भूमिकेचे नाव सैफिना आहे. टीजरमध्ये रॅप करताना दिसणाऱ्या रणवीरचा आलिया आणि को-अक्ट्रेस कल्की कोचलिनसोबत लिपलॉक सीन्सही आहे. टीजर पाहिल्यानंतर दीपिका पादुकोणही स्वतःला पतीचे कौतुक करण्यापासून राखू शकली नाही. दीपिकाने सोशल मीडियावर कमेंट करून लिहिले, "आय लव्ह यू आणि मला तुझ्यावर खूप गर्व आहे. यू आर अनस्टॉपेबल". रणवीरच्या रॅप सॉन्गची एक झलक प्रियंकाच्या मुंबईतील रिसेप्शनदरम्यान मिळाली होती. जिथे तो डीजेसोबत रॅप करताना दिसला. रॅपर डिवाइनच्या लाइफने इंस्पायर्ड झालेली ही फिल्म 14 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. 

 

'गली बॉय' मध्ये रिजर्व नेचर असलेल्या मुलाची भूमिका करत आहे रणवीर...
- दैनिक भास्करसोबत बातचीतदरम्यान रणवीरने सांगितले, "सिम्बामध्ये मी एक मनोरंजक, बदमाश आणि प्रेमळ माणसाची भूमिका निभावली आहे. मात्र 'गली बॉय' मध्ये माझी भूमिका एका रिजर्व, इंट्रोवर्ट आणि शांत माणसाची आहे. यामध्ये करण्यासारखे खूप काही आहे. सिम्बाची भूमिका माझ्यासारखीच होती". 

 

- "मी लकी आहे की, मला याप्रकारचे वेगवेगळे रोल करायला मिळत आहेत. कारण मला नेहमीच एक व्हर्सटाईल अॅक्टर व्हायचे होते. जर माझ्याकडे तेवढी योग्यता आणि सामर्ध्य आहे तर माझा प्रयत्न ती वर्साटालिटि दाखवण्याचाच असतो. प्रत्येक फिल्ममेकरला याबाबतीत विस्वास झाला पाहिजे की, मी त्यांच्या फिल्ममध्ये फिट होईन"

 

- रणवीर म्हणाला, "सिंबामध्ये मी एक अशी भूमिका निभावण्याची प्रयत्न केला आहे जे तुम्ही यापूर्वी कधीच पहिले नसेल. फिल्ममध्ये अनेक चांगले पात्र आहेत. एक अभिनेता म्हंणून तुम्हाला तुमच्यात काहीतरी विशेष असे निर्माण करावे लागते आणि त्यासाठी नेहमी गृहपाठ करणे आवश्यक असते. हे वर्ष आणि याआधीचे वर्ष खूप सुखद होते. मला एक निगेटिव रोल करायचा होता, आणि 'पद्मावत' मध्ये मला तो करण्याची संधीही मिळली.