आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर सिंहचा खुलासा - 3 वर्षांपूर्वीच करायचे होते दीपिकासोबत लग्न पण फक्त एका गोष्टीसाठी करावी लागली एवढी प्रतिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो येथे लग्न थाटले. कोंकणी आणि सिंधी पद्धतीने दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. दरम्यान रणवीरने फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकासोबतची त्याची लव्ह स्टोरी शेअर केली. त्याने सांगितले की, ती वर्षांपूर्वीच त्याला दीपिकासोबत लग्न थाटायचे होते, पण फक्त एका कारणासाठी त्याला एवढी प्रतिक्षा करावी लागली. रणवीरची ही मुलाखत फिल्मफेअरच्या डिसेंबर महिन्याच्या अंकात प्रकाशित होणार असून यासाठी त्याने एक खास फोटोशूटही केले आहे.


कळून चुकले होते हीच ती व्यक्ती आहे... 
मुलाखतीत रणवीरने सांगितले की, 6 महिन्यांच्या रिलेशनशिपनंतरच हीच व्यक्ती आयुष्याचा जोडीदार बनू शकते, हे मला कळून चुकले होते. आम्ही 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिलो. याकाळात कायम असंच वाटलं की, हिच्यासोबतच मी लग्न करुन संसार करु शकतो. दीपिकाच माझ्या मुलांची आई व्हावी, अशी माझी इच्छा होती.


- रणवीरने सांगितले- गेल्या तीन वर्षांपासून मी केवळ लग्नाच्याच विचारात होतो. फक्त दीपिकाच्या होकाराची वाट बघत होतो. तिचा होकार येताच क्षण न दवडता लग्न करेल, असे मी ठरवले होते.

 

तिला जे हवे होते, तेच मी केले
- भारत सोडून इटलीतील लेक कोमो येथे लग्न का केले? या प्रश्नाचे उत्तर देताना रणवीर म्हणाला, मीच तेच केले जे तिला हवे होते. लग्नासाठी तिने बरीच स्वप्न रंगवली होती आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे हे माझे कर्तव्य होते. तिला जसे हवे होते, तसेच सगळे झाले. ती हे सगळं डिझर्व्ह करते. मला आनंद हवा आहे आणि माझा आनंद हा दीपिकाच्या आनंदातच आहे.

 

-  14-15 नोव्हेंबर रोजी इटलीत लग्न झाल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी बंगळुरु येथे दीपिका-रणवीरचे पहिले वेडिंग रिसेप्शन झाले. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी मुंबईत एक पार्टी झाली. आता 1 डिसेंबर रोजी बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी हे कपल हॉटेल ग्रॅण्ड ह्यात येथे आणखी एक वेडिंग रिसेप्शन देणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...