आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅक टू वर्क/ लग्नाच्या 10 दिवसांनंतर कामावर परतला रणवीर सिंह, सुरु केली सिम्बाची डबिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. रणवीर सिंहने सिम्बाची शूटिंग या महिन्याच्या सुरुवातीला पुर्ण केली होती. तर दिवाळीदरम्यान लग्नाच्या तयारीला सुरुवात केली होती. 14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीमध्ये रणवीर-दीपिकाने कोंकणी आणि सिंधी पध्दतीने लग्न केले. नंतर कपलने भारतात येऊन 21 नोव्हेंबरला बेंगळुरुमध्ये रिसेप्शन दिले. यानंतर रणवीर तात्काळ कामात व्यस्त झाला आहे. 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणवीरचे शेड्यूल खुप व्यस्त होते.. हा चित्रपट भारत आणि विदेशात बॅक टू बॅक शूट केला गेला होता. आता चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होण्यासाठी तयार आहे. मेकर्सजवळ पोस्ट प्रोडक्शन कम्पीट करण्यासाठी वेळ नाही. यामुळे रणवीर मुंबईमध्ये परत येताच यशराज स्टूडियोमध्ये डबिंगसाठी जाताना स्पॉट झाला. चित्रपटाचे क्रू मेंबर्सही पोस्ट प्रोडक्शनवर मेहनत करत आहेत. कारण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. 


मुंबई रिसेप्शननंतर लान्च होणार ट्रेलर 
दीपिका आणि रणवीरच्या मुंबई रिसेप्शनच्या तात्काळ नंतर सिम्बा चित्रपटाचा ट्रेलर लान्च होणार आहे. यानंतर रणवीर चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करु शकतो. तो अनेक रिअॅलिटी शोजमध्ये उपस्थित राहिल, यासोबतच मीडियासोबत बातचित करताना दिसेल. 

 

सिम्बानंतर बॅक टू बॅक चित्रपट 
सिम्बानंतर रणवीर सिंह व्यस्त राहणार आहे. त्याचा गली बॉय चित्रपट फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार आहे. यासाठी त्याला जानेवारीपासून प्रमोशन सुरु करावे लागेल. यामध्ये आलिया भट हिरोइन आहे आणि चित्रपटाचे डायरेक्शन जोया अख्तर करत आहे. गली बॉयनंतर तो तख्तची शूटिंग सुरू करणार आहे. यामध्ये आलिया भट, करीना कपूर खान, जान्हवी कपूर, भूमी पेडनेकर आणि विक्की कोशल काम करणार आहेत. तर दूसरीकडे दीपिका मार्च महिन्यात अॅसिड अटॅकचा सामना केलल्या लक्ष्मीवर तयार होणा-या चित्रपटात काम करणार आहे. 

 

 

📷| Ranveer Singh spotted at YRF Studios dubbing for Simmba , Today ❤️ pic.twitter.com/FZfFeWdovq

— RanveerSingh TBT💗 (@RanveerSinghtbt) November 23, 2018

बातम्या आणखी आहेत...