आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित शेट्टीच्या \'सिम्बा\'चा ट्रेलर रिलीज, चित्रपटात मराठी कलाकारांची वर्णी, पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसला रणवीर सिंह, ट्रेलरमध्ये दिसली \'सिंघम\'ची झलक : Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई – रोहित शेट्टी दिग्दर्शित बहुचर्चित ‘सिम्बा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात रणवीर सिंह मेन लीडमध्ये असून ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेली सारा अली खान मुख्य भूमिकेत आहे. 2 मिनिटे 54 सेकंदाच्या या ट्रेलरच्या सुरुवातीला 'सिंघम' चित्रपटातील अजय देवगणचेही काही स्टंट दाखविण्यात आले आहे. सिम्बाचा ट्रेलर पाहता हाही चित्रपट रोहित शेट्टी दिग्दर्शित इतर चित्रपटांसारखा पैसा वसूल करणार ठरेल असेच वाटत आहे. 'सिम्बा'मध्ये मराठी कलाकारांची फौज दिसणार आहे. सिद्धार्थ जाधव, गणेश यादव, वैभवी परशुरामीसह आणखी काही मराठी कलाकारांची वर्णी लागल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे.  ट्रेलरमध्ये रणवीरची जबरदस्त एन्ट्री बघायला मिळतेय. एकापेक्षा एक डायलॉग या ट्रेलरमध्ये आहेत. रणवीरच्या तोंडी असलेल्या  'ये कलयुग है कलयुग यहां लोग अपने मतलब के लिए जीते हैं'सह अनेक डायलॉग लक्षात राहणारे आहेत. एका डायलॉगमध्ये तो म्हणतो, मैं पुलिसवाला बना पैसा कमाने केको रॉबिनहुड बनकर दूसरों का मदद करने को नहीं.' या चित्रपटात सिंघम चित्रपटातील अजय देवगणचे काही सीन्स दाखवण्यात आले आहेत. सिम्बा हा चित्रपट टेंपर या तेलुगु चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. तेलुगु चित्रपटात ज्युनिअर एनटीआरने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट येत्या 28 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...