आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Simmba 1st Day Box Office Collection: रणवीर-साराच्या 'सिंबा'ने भारत आणि ओव्हरसीजमध्ये पहिल्या दिवशी जमवला एवढ्या कोटींचा गल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहित शेट्टीचा ‘सिंबा’ हा चित्रपट 28 डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. चित्रपटाला समिक्षकांसह प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. रोहित शेट्टीचे दिग्दर्शकन रणवीरसह इतर कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात यशस्वी झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'सिंबा' बॉक्स ऑफिसवर 15 कोटींहून अधिकचा गल्ला जमवण्यात यशस्वी झाला आहे.  तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18 कोटींहून अधिक कमाई केली असेल असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक गिरीष जोहर यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना वर्तवला आहे.  


विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियातही या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने तिथे 88.58 लाखांची कमाई केली असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्वीटरवरुन दिली आहे. भारतात हा चित्रपट 4020 स्क्रिन तर जगभरातील 963 स्क्रिनवर रिलीज झाला आहे.  

A section of the industry was of the opinion that #Simmba wouldn’t rake in big numbers Overseas, due to the masala quotient... But the audience knows best... #Simmba embarks on one of the best starts in #Australia... Fri A$ 180,253 [₹ 88.58 lakhs]. @comScore

— taran adarsh (@taran_adarsh) December 29, 2018

 

आगामी दिवसांत यामुळे वाढू शकते 'सिंबा'चे कलेक्शन..
>> 'झिरो'कडून निराशा पदरी आल्याने ऐन ख्रिसमसच्या फेस्टीव्ह सिझनमध्ये प्रेक्षकांना चांगला पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे सिंबाला चांगले बुकींग मिळत असल्याचे दिसते आहे. 
>> सिंबा हा चित्रपट रोहित शेट्टी यांचा हातखंडा असलेला फुल टू मसाला एंटरटेनर स्टाइलजचा चित्रपट आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची गर्दी पहिल्या दिवशी नक्की होणार या काही शंका नाही. 
>> चित्रपटाची स्टार व्हॅल्यू मोठी आहे. एकतर चित्रपटाला सिंघमचे बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे ट्रेलरमध्ये दिसल्याप्रमाणे अजय देवगणची लहानशी असली तरी महत्त्वाची भूमिका चित्रपटात आहे. त्यात रणवीर सिंगसाठी क्रेझी असलेले फॅन्स आहेत. शिवाय केदारनाथ द्वारे पदार्पण केलेल्या साराचाही मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. त्यामुळे यासर्वांचा याला फायदा होणार आहे. 
>> चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड पसंती मिळाली आहे. आँख मारे.. गाण्याने तर सर्वत्र धूम केली आहे. 
>> वीकेंड आणि न्यू इअर फिव्हरचा फायदा सिंबाला नक्की मिळणार आहे. फेस्टीव्ह मूड असल्याने थिएटर्सला गर्दी होणार यात शंका नाही.

बातम्या आणखी आहेत...