Home | News | Ranveer Singh Scolded Man For Rash Driving Video Is Going Viral

चोराच्या उलट्या बोंबा... वेगात गाडी चालवणा-या व्यक्तीला रणवीरने रागावले असता, त्यालाच सुनावले खडे बोल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 07, 2018, 06:32 PM IST

रणवीर सिंगला एका व्यक्तीने सोशल मीडियावर खडे बोल सुनावले आहेत.

  • Ranveer Singh Scolded Man For Rash Driving Video Is Going Viral

    सेलिब्रिटी असण्याचे जेवढे फायदे आहेत, किंबहून तेवढेच तोटेदेखील आहेत. मोठ्या स्क्रिनवर आल्यानंतर लोकांमध्ये चांगली इमेज बनवणे या सेलिब्रिटींसाठी सोपे आहे, पण कधीकधी एक चुक त्यांची प्रतिमा मलिन करते. रणवीर सिंग एकामागून एक हिट चित्रपट देत असून करिअरमध्ये यशोशिखरावर आहे. अनेकांचा तो आवडता अभिनेता आहे. यावर्षाच्या अखेरीस त्याचा 'सिम्बा' हा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटाचे पोस्टरही सोशल मीडियावर पसंत केले जात आहे.


    पण काही दिवसांपूर्वी रणवीरसोबत अशी एक घटना घडली, जी प्रत्येकाला हैराण करणारी आहे. रणवीर सिंगला एका व्यक्तीने सोशल मीडियावर खडे बोल सुनावले आहेत. एक व्हिडिओदेखील शेअर केला, ज्यामध्ये रणवीर रश ड्रायव्हिंग करण्या-या व्यक्तीला रागवताना दिसतोय.

    हा व्हिडिओ @aquariussandesh नावाच्या अकाउंटवर शेअर झाला आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजे 31 ऑगस्ट रोजी रणवीर सिंगने एक छायाचित्र शेअर केले होते, त्यामध्ये तो अंतर्वस्त्रात दिसत होता. या फोटोला बरेच लाइक्स आणि कमेंट आले. पण कमेंटमध्ये एका यूजरने हा व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले, 'मुर्ख माणसा तुला काही शिस्त आहे की नाही? तुझ्यासारखी व्यक्तीला हेदेखील ठाऊक नाही, की आईबहिणींसोबत एवढी शिवीगाळ कुणी करत नसतं? मुर्ख माणसा तुझा असाच अॅटिट्युड राहिला तर लवकरच रस्त्यावर येशील. पहिले स्वतः शिस्त शिक आणि नंतर हीरो बन फ्लॉप अॅक्टर.' हा व्हिडिओ बराच व्हायरल होतोय.


    काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कारने जात होते. त्यांच्या शेजारुन जाणा-या एका कारमधून एका तरुणाने कचरा गाडीबाहेर फेडकाल. त्यानंतर अनुष्काने त्या तरुणाला रागावले होते. त्यानंतर रश ड्रायव्हिंग करणा-याला रणवीर सिंगने रागावले. हा व्हिडिओही झपाट्याने व्हायरल होतोय.

Trending