आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranveer Singh Sets Aside Time For Childhood Friend Simone Khambata; Did Ramp Walk For Her Show

बालपणीची मैत्रीण सिमोन खंबाटासाठी रणवीर सिंहने काढला वेळ, रॅम्पवॉक करून दिले सरप्राईज 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : रणवीर सिंग सध्याच्या व्यग्र कलाकारांपैकी एक आहे. तरीही तो आपल्या मित्रांसाठी वेळ काढतो. नुकतेच त्याने आपल्या बालपणाची मैत्रीण सिमोन खंबाटासाठी वेळ काढला आणि तिच्यासाठी रॅम्पवॉक केला. खरं तर सिमोन, वधू डिझायनर असण्याव्यतिरिक्त पुरुषांचे कपडेदेखील तयार करते. नुकतेच तिने दोन दिवसांच्या प्रदर्शनात तिचे कलेक्शन सादर केले. जेव्हा रणवीरला याची माहिती मिळाली तेव्हा त्याने अापल्या टीमला सांगून इतर कार्यक्रम रद्द करायला लावले, जेणेकरून त्याला सिमोनच्या कार्यक्रमात भाग घेता यावा म्हणून.

स्वतः सिमोनने ही माहिती दिली. ती म्हणाली, 'रणवीर आणि माझी लहानपणीची मैत्री आहे. माझ्या वाढदिवशी गोविंदाच्या गाण्यांवर नाचणारा हा मुलगा एक दिवस पुढे जाऊन नक्कीच स्टार बनेल हे मला माहीत होते. तो सुरुवातीपासूनच मला सरप्राइज देत असतो. रॅम्पवॉकदेखील एक सरप्राइज गिफ्ट होते.

दुसरीकडे रणवीरने सांगितले, ‘डिजायनर सिमोनकडे अनोखी क्रिएटिव्हिटी आहे. ती लहानपणापासून माझ्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. रॅम्पवॉकद्वारे मी तिला सपोर्ट करू इच्छित होतो, त्याच्या अचीव्हमेंटचा मला अभिमान आहे.