आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीरने दाखवला 'सिम्बा'मधील मस्कुलर लूक, लोक म्हणाले - 'कोणते प्रोटीन सप्लिेमेंट घेतोस तू भाऊ'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या आगामी 'सिम्बा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या या चित्रपटात रणवीरचे जबरदस्त अॅक्शन बघायला मिळणार आहेत. चित्रपटातील भूमिकेची गरज लक्षात घेऊन रणवीरने मसल्स बनवले आहेत. रणवीरने आपल्या न्यू लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर रणवीरचे फॅन्स त्याला 'कोणते प्रोटीन सप्लिेमेंट घेतोस तू भाऊ', असा प्रश्न विचारत आहेत. 

 

रणवीरची बॉडी बघून टायगरने केली कमेंट... 

सिम्बामधील रणवीरचा मस्कुलर लूक बघून टायगर श्रॉफसुद्धा अवाक् झाला आहे. त्याने रणवीरच्या फोटोवर कमेंट करुन लिहिले, Damm Soon...(लवकरच). टायगरच नव्हे तर 'संजू' चित्रपटातील अभिनेता विक्की कौशलनेही रणवीरच्या फोटोवर कमेंट करताना लिहिले, 'लवकरच तुमच्याकडे अशी बॉडी मिळवण्यासाठी टीप्स घ्यायला येईल.' 


वर्षाच्या अखेरीस रिलीज होणार सिम्बा.... 
15 ऑगस्ट रोजी दिग्दर्शक रोहित शेट्टीने 'सिम्बा'चा मेकिंग व्हि़डिओ रिलीज केला होता. यामध्ये महिलांचा आदर करताना चित्रपटातील हीरो गुंडांना कसा धडा शिकवतो, हे दाखवण्यात आले. 'सिम्बा' याचवर्षी 28 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणवीरच्या अपोझिट सैफ अली खानची मुलगी सारा अली खान असणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...