आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलेब लाइफ : पत्नी दीपिकाची सॅंडल हातात घेऊन उभा दिसला रणवीर सिंह, लोक करत आहेत कौतुकाचा वर्षाव 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : रणवीर सिंह पत्नी दीपिका पदुकोणसाठी असलेले त्याचे प्रेम वेळोवेळो वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतो. लग्नापूर्वीही त्याने अनेक प्रसंगी दीपिकासाठी आपल्या फीलिंग्स व्यक्त केल्या आहेत, पण अशातच रणवीरने असे कात्री केले कि त्यामुळे लोक त्याचे भरभर कौतुक करत आहेत. ही जोडी मुंबईमध्ये एका लग्नासाठी गेली होती. दोघांनी एकत्र ग्रँड एंट्री घेतली. काही वेळानंतर रणवीर पत्नीचे सॅंडल हातात घेऊन उभा दिसला. दीपिकाच्या पायांना काही वेळासाठी त्या हाय हील्सपासून अराम मिळावा कदाचित यासाठीच रणवीरने असे केले असावे. रणवीरचे पत्नीप्रेम पाहून प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहे. 

लोक झाले रणवीरवर खुश... 
दीपिका रणवीरचे हे फोटोज इंस्टाग्राम आणि इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्हायरल झाले आहेत. लग्न दीपिकाच्या नातेवाईकाचे होते त्यामुळे ती सर्वांना भेटण्यात व्यस्त होती. यावेळी ती एका प्रौढ व्यक्तीला भेटण्यासाठी त्यांच्याजवळ गेली तेव्हा रणवीरदेखील तिच्यामागे हातात तिची सॅंडल घेऊन उभा दिसला. हे पाहून तिथे उभा असलेला प्रत्येकजण रणवीरकडे खूप कौतुकाने पाहत होता.  

फिल्ममध्ये व्यस्त आहेत रणवीर-दीपिका... 
दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर रणवीर लवकरच फिल्म '83' च्या शूटिंगसाठी लंडनला जाणार आहे. सध्या तो क्रिकेट ट्रिक्स शिकण्यात व्यस्त आहे. दीपिका फिल्म 'छपाक'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या फिल्मचे पहिले शेड्यूल दिल्लीमध्ये पूर्ण झाले. जिथे एकीकडे रणवीर कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर दीपिका अॅसिड अटॅक सर्वायव्हर लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या अत्यंत व्यस्त शेड्यूलमधून वेळ कढून मुंबईमध्ये झालेल्या या लग्नात ते पोहोचले होते. 

बातम्या आणखी आहेत...