आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranveer Singh Wore Rejected Dresses Of Filmmaker Karan Johar,Ranveer Got Gift 3.5 Lakh Tracksuit Also From Him Reveal In Koffee With Karan

इंडस्ट्रीमध्ये एका व्यक्तीचे रिजेक्टेड कपडे घालतो रणवीर सिंह, मिळाला आहे 3.5 लाखांचा ट्रॅक सूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 'कॉफी विद करण' या चॅट शोमध्ये आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण नुकत्याच येऊन गेल्या. या शोचे पुढचे पाहूणे रणवीर सिंह आणि अक्षय कुमार असणार आहे. या दरम्यान रणवीर शोमध्ये अनेक मजेदार खुलासे करणार आहे. रणवीर हा फंकी फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. त्याने सांगितले की, यामध्ये अनेक कपडे मला करणने दिले आहे. करणला शॉपिंग करणे खुप आवडते, अशा वेळी तो अनेक कपडे खरेदी करतो. पण घरी आल्यावर तो यामधील अनेक कपडे रिजेक्ट करतो. यानंतर हेच फ्रेश कपडे तो रणवीरला देतो. 


रणवीरला दिला आहे लाखोंचा ट्रॅकशूट 
- न्यूज वेबसाइट मिड-डेनुसार रणवीरने सांगितले की, "करण आपल्या शॉपिंग ट्रिप दरम्यान अनेक महागडे कपडे खरेदी करतो आणि त्याला जेव्हा वाटते की, तो हे कॅरी करु शकणार नाही. तेव्हा तो हेच ब्रांडेड कपडे मला देतो."
- आतापर्यंत करणने त्याला अनेक कपडे दिले आहेत. यामध्ये एका फंकी ट्रॅकशूटचाही समावेश आहे. याची किंमत 3.4 लाख रुपये आहे. रणवीर या गिफ्टेड कपड्यांना खुप काळजीने वापरतो. 
- रणवीरने या शोमध्ये त्याच्या आणि अक्षयच्या पहिल्या भेटीविषयी सांगितले. त्याने सांगितले की, अक्षय जेव्हा रवीना टंडनसोबत एका चित्रपटाची शूटिंग करत होता, तेव्हा त्यांची पहिली भेट झाली होती. 

 

बिझनेसमन आहे रणवीरचे वडील 
- 14-15 नोव्हेंबरला दीपिका पदुकोण आणि रणवीरचे लग्न आहे. रणवीरने आपल्या करिअरची सुरुवात एक कॉपी रायटर म्हणून सुरु केली होती. तो एक जाहिरात एजन्सी ओ अँड एम मध्ये काम करत होता. येथे त्याने अनेक वर्षे काम केले. 
- काही वर्षे कॉपी रायटरचे काम केल्यानंतर त्याने चित्रपटांसाठी ऑडिशन देणे सुरु केले. ऑडिशननंतर त्याला चित्रपटांमध्ये लहान-मोठे रोल मिळू लागले. पण त्याला चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारायची होती. 
- त्याने 2010 मध्ये 'बँड बाजा बारात' चित्रपटातून डेब्यू केला होता. पण या चित्रपटापुर्वी त्याने तीन चित्रपट रिजेक्ट केले होते. पहिल्या चित्रपटावेळी अफवा पसरली होती की, 'बँड बाजा बारात'च्या वेळी रणवीरच्या वडिलांनी चित्रपट बनवण्यासाठी आदित्य चोप्राला पैसे दिले. पण रणवीने या सर्व गोष्टींचे खंडन केले. तो म्हणाला की, मला माझ्या टॅलेंटच्या बळावर हा चित्रपट मिळाला. 
- रणवीरचे वडील जगजीत सिंह भवनानी हे बिझनेसमन आहेत. ते दिल्ली येथे राहतात. ते ऑटोमोटिव्ह रिटेल्स डील करतात. यासोबतच लेदर, हॉस्पिटॅलिटी आणि मेडिकल बिझनेसमध्ये काम करतात.
- रणवीर सिंहचे पुर्ण नाव रणवीर सिंह भावनानी आहे. त्याला वाटले की, हे लोकांना खुप अवघड वाटेल. म्हणून त्याने आपल्या नावासमोरील भावनानी हे नाव काढून टाकले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...