आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दररोज 12 षटके गोलंदाजी, 200 चेंडू फलंदाजी करत रणवीर बनला कपिल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : '83' चित्रपटामध्ये रणवीरसिंह माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांचे पात्र साकारताना दिसेल. या पात्रासाठी त्याला फिटनेस कन्सल्टंट राजीव मेहराने प्रशिक्षण दिले आहे. कपिल यांच्या पात्रामध्ये स्वत:ला ढाळण्यासाठी रणवीरने काय-काय केले हे राजीवने दिव्य मराठीला खासकरून सांगितले. जाणून घेऊया तो काय म्हणाला.... 

राजीव म्हणाला, 'रणवीरला मोशनमध्ये कॉन्फिडन्स मिळण्याची काळजी घ्यावी लागत होती'
गोलंदाजीमुळे तुमच्या लोअर बॉडीवर खूप ताण पडतो. कारण तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा तुमचे वजन कधी फ्रंट फूटवर आणि कधी बॅक फुटवर असते. मला हे लक्षात ठेवायचे होते की, रणवीरचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, असेच व्यायामप्रकार असावेत. जर तो वेगाने धावला तर त्याच्या गुडघ्यांना इजा होऊ शकते, अशी आम्हाला शंका होती. त्यामुळे मला त्याची ही भीतीदेखील घालवायची होती.'


कबीर खान  म्हणाला, 'रणवीर पूर्णपणे कपिल यांच्यासारखा दिसत हो
ता' 
'रणवीर आपल्या प्रत्येक पात्रामध्ये पूर्णपणे झोकून देतो. सेटवर मी त्याचे समर्पण पाहिले आहे. तो अनेकदा कट म्हटल्यानंतरही भावुक व्हायचा. या पात्रासाठी त्याने खूप मेहनत घेतली आणि कपिल यांचे पात्र सक्षमपणे उभे केले. त्यामुळेच तो हुबेहूब कपिलसारखाच वाटत होता. कपिल यांची मुलगी अमिया देवलाही हे समर्पण खूपच आवडले.'

10 किलाे कमी केले होते वजन सर्वप्रथम.
04 तासांसाठी कमीत कमी व्यायामाचे सत्र असायचे दररोज
.

अशी असायची दिनचर्या... 
- सर्वात आधी सकाळी २० मिनिटे फुटबॉल खेळून रणवीर वॉर्मअप करत होता.
- यानंतर संपूर्ण शरीराला स्ट्रेचिंग देत होता.
- यानंतर रणवीर जवळपास १२ ते १३ षटके टाकून गोलंदाजी करत होता.
- इतक्या गोलंदाजीनंतर १०० ते २०० चेंडू खेळत फलंदाजीही करत होता.
- यादरम्यान ब्रेक घेऊन आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीचे व्हिडिअाे पाहून नोट्सही काढत होता.
- कमीत कमी ४ तासांचे व्यायामाचे सत्र व्हायचे दररोज.

शरीरावर केला फोकस... 
- त्याचे प्रशिक्षण केवळ वजन कमी करण्यापुरतेच नव्हते, तर गोलंदाजी करताना आणि धावताना त्याच्या स्नायूंना ताकद मिळेल, अशा पद्धतीने व्यायाम डिझाइन करण्यात आला.
- ज्यात लोअर बॉडीतून अपर बॉडीमध्ये जावे लागते, असे व्यायामप्रकारही त्याने केले.
- 'प्रशिक्षणावेळी रणवीरचे ८५ किलो होते. चित्रपटासाठी त्याला १० किलो वजन कमी करावे लागले. कारण '८३' विश्वचषकादरम्यान कपिल यांचे वजन ७५ किलो होते.
- रणवीरचे गुडघे खूप कमजोर असले तरी त्याला वेगाने धावत गोलंदाजीही करायची होती. प्रशिक्षकाने त्याच्या गुडघ्याच्या आसपासचे स्नायूदेखील सक्षम केले.
- पॉवर मूव्हमेंट ट्रेनिंगही देण्यात आली. त्यामध्ये उडी मारत कसे एका पायावर लँड केले जाते, हे सांगण्यात आले आहे.
- क्षमता व ताकद वाढवण्यासाठी ऑलिम्पिक लिफ्टिंग केली.
- याशिवाय ४० मिनिटे पोहण्यासाठी देत होता. यामुळे त्याची अतिरिक्त कॅलरी जळत होती.

बातम्या आणखी आहेत...