आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. रणवीर-दीपिका पदुकोणने 14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमोमध्ये लग्न केले. दोघांचे पहिले रिसेप्शन 21 नोव्हेंबरला बेंगळुरुच्या 'द लीला पॅलेस' हॉटेलमध्ये झाले होते. यानंतर रणवीरची बहिण रितिका भवनानीने शनिवारी मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये आपल्या दादा-वहिनीसाठी रिसेप्शन ठेवले. यावेळी रितिकाने दादा-वहिनीला एक अनोखे गिफ्ट दिले. रितिकाने भाऊ रणवीर आणि वहिनी दीपिकासाठी खास मिठाई तयार करुन घेतली. या मिठाईमध्ये चॉकलेट कॉन रीलच्या रुपात दिसत होते. विशेष म्हणजे या रीलमध्ये दीपिका आणि रणीरच्या चित्रपटांचे पोस्टर होते.
रितिकाने दादा-वहिनीला सुंदर पोर्टेटही गिफ्ट केले
- मिठाईसोबतच रील आणि क्लॅप (चित्रपटाच्या मुहूर्तावेळी यूज केले जाणारे) ही गिफ्टमध्ये देण्यात आले. यावर दीपिका-रणीच्या लग्नाची तारीख 14 नोव्हेंबर ही लिहिलेली होती- मूव्ही ऑफ लाइफ दीपवीर. यासोबतच रितिकाने दीपवीरचे पोर्टेटही त्यांना गिफ्ट केले.
- 28 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला दीपवीरच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे.
फर्स्ट रिसेप्शनमध्ये दीपिकाचा पदर सांभाळताना दिसला होता रणवीर
लग्नानंतर बंगळुरुमध्ये दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन ठेवण्यात आले होते. येथे दीपिका गोल्डन साडीमध्ये दिसली होती तर रणवीर ब्लॅक अँड गोल्डन शेरवानीमध्ये दिसला होता. स्टेजवर पोहोचल्यावर रणवीर दीपिकाचा पदर सावरताना दिसला होता. यानंतर रणवीरने दीपिकाला फ्लाइंग किसही दिली होती.
रणवीर आणि मी एकत्र असताना आम्हाला कुणाची गरज नाही : दीपिका
रणीर आणि दीपिकाचे अफेअर रामलीला : 'गोलियों की रासलीला' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुरु झाले होते. यानंतर ते दोघं अजून तीन चित्रपटात एकत्र द दिसले. 6 वर्षे डेटिंग केल्यानंतर हे दोघं विवाह बंधनात अडकले. 14 नोव्हेंबरला कोंकणी पध्दतीने आणि 15 नोव्हेंबरला सिंधी पध्दतीने त्यांनी लग्न केले. दोघंही एकमेकांची कंपनी खुप एन्जॉय करतात. एका मुलाखतीदरम्यान दीपिका म्हणाली होती की, "जेव्हा मी आणि रणवीर एकत्र असतो तेव्हा आम्हाला दूस-या कुणाचीही गरज नसते."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.