आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'83' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असूनही रणवीरने लंडनमध्ये फॅन्ससोबत काढला सेल्फी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवुड डेस्क : रणवीर सिंह सध्या आपला आगामी चित्रपट '83' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये होत आहे. यादरम्यान अभिनेत्याचे फॅन्स त्याला भेटण्यासाठी पोहोचले आहेत. रणवीरने स्वतः त्यांच्याकडून मोबाइल घेऊन आपल्या फॅन्ससोबत सेल्फी क्लिक केला. फोटोमध्ये रणवीरच्या फीमेल फॅन्स दिसत आहेत. 

 

फॅन्सच्या कॅमेऱ्याने घेतला सेल्फी... 
रणवीर ब्लॅक राउंड नेक टी-शर्टमध्ये दिसत आहे. यासोबतच त्याने ब्लॅक फंकी सन ग्लासेस लावलेले आहेत. त्याच्या फीमेल फॅन्स व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. हा अभिनेता नेहमीच आपल्या फॅन्सची खूप रिस्पेक्ट करतो आणि येथेही त्याने असेच केले. '83' चे दिग्दर्शन कबीर खान करत आहेत. हा चित्रपट 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजयावर आधारित आहे. रणवीर सिंह, कपिल देव यांच्या रोलमध्ये दिसणार आहे तर कपिल यांच्या पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका दीपिका पदुकोण साकारत आहे. हा चित्रपट पुढच्यावर्षी एप्रिलमध्ये रिलीज होईल.  

 

दीपिका साकारत आहे ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका... 
रणवीर-दीपिका यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात अमी व्रिकम, साकिब सलीम, हार्डी संधु, चिराग पाटिल, साहिल खट्टर आणि पंकज त्रिपाठी मुख्य मुख्य भूमिकांमध्ये आहेत. रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर '83' नंतर रणवीर, करण जोहरच्या चित्रपट 'तख्त' चे शूटिंग सुरु करणार आहे. हा एक पीरियड ड्रामा आहे. रणवीरसोबतच यामध्ये विकी कौशल, आलिया भट्ट, भूमि पेडनेकर, करिना कपूर खान आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.