आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranveer Told About His Upcoming Film Jayeshbhai Jordaar Is Miraculous Script And His Role An Improbable Type Hero

महिलांचे संरक्षण करणार ‘जयेशभाई जोरदार’, रणवीर म्हणाला - ही एक चमत्कारी स्क्रिप्ट आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः यशराज फिल्म्ससोबत आतापर्यंत पाच चित्रपट केलेला रणवीर सिंह पुन्हा एकदा याच बॅनरचा चित्रपट ‘जयेशभाई जोरदार’मध्ये दिसेल. या चित्रपटात रणवीर एका गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत दिसेल. ही एक चमत्कारी स्क्रिप्ट असल्याचे तो सांगतो. लेखक-दिग्दर्शक दिव्यांग ठक्कर यांचा हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होईल. 

  • भूमिकेविषयी काय म्हणाला रणवीर...

चित्रपटामधील आपल्या पात्राबाबत रणवीरने सांगितले, ‘जयेशभाई एक सामान्य व्यक्ती असून तो एखाद्या असामान्य स्थितीत आल्यावर सर्वकाही सामान्य करतो. तो संवेदनशील आणि कनवाळू आहे. तो समाजामध्ये पुरुष आणि महिलांना समान अधिकार असण्यावर विश्वास ठेवतो. या पात्राने माझ्यासमोर एक रंजक आव्हान उभे केले. मी यापूर्वी स्वत: अशा प्रकारचे पात्र कधी जगलोच नाही.’

  • पोस्टरमध्ये काय आहे खास...

- चित्रपटासाठी रणवीरने अनेक किलोने वजन कमी केले आहे. - तो आपल्या मागे उभ्या महिलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे. हा चित्रपट महिला सबलीकरणाचे समर्थन करेल, हे स्पष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...