आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranveer Wore Rejected Dresses Of Karan Johar, He Got 3.5 Lack Rupee Tracksuit From Him

इंडस्ट्रीतील एका व्यक्तीचे रिजेक्टेड कपडे वापरतो रणवीर सिंह, कपड्यांसोबतच मिळाला आहे 3.5 लाखांचा ट्रॅक सूट, बिझनेसमन फॅमिलीतून करतो Belong

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चॅट शो 'कॉफी विथ करन' मध्ये आलिया भट्ट अणि दीपिका पादुकोणनंतर आता रणवीर सिंग आणि अक्षय कुमार पाहुणे म्हणून येणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान रणवीरने काही शॉकिंग खुलासे केले आहेत. रणवीर आपल्या फंकी फॅशन सेंससाठी ओळखला जातो. पण रणवीरने सांगितले की, त्याच्याकडे असलेले अनेक कपडे करण जोहरने दिले आहेत. खरं तर करणला शॅापिंग खूप आवडते. तो कपडे तर खूप विकत घेतो. पण सगळेच वापरत नाही. त्यातील अनेक नवीन ड्रेस त्याने रणवीरला दिले आहेत. त्यापैकीच लाखो रुपयांचा  एक ट्रॅक सूट देखील त्याने रणवीरला गिफ्ट केला आहे.

 

> एका न्यूज वेबसाइटशी बोलताना रणवीरने सांगिते, की "करण आपल्या प्रवासादरम्यान महाग कपडे विकत घेत असतो. जेव्हा त्याला वाटते की आपण ते कॅरी करु शकणार नाही, तेव्हा ते ब्रँडेड कपडे मला देतो."

> आतापर्यंत, करणने त्याला खूप कपडे दिले आहेत, ज्यात फंकी ट्रॅकसूटचा समावेश आहे, ज्याची किंमत 3.5 लाख रुपये आहे. रणवीर या भेटवस्तूंना अतिशय मोल्यवान मानतो.

> रणवीरने शो दरम्यान सांगितले, की अक्षय कुमारसोबत त्याची पहिली भेट कशी झाली. त्यावेळी अक्षय रवीना टंडनबरोबर एका चित्रपटाचे शूटिंग करत होता.

 

उद्योजक आहेत रणवीरचे वडील
- 14-15 नोव्हेंबर रोजी दीपिका पदुकोणसोबत लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या रणवीरने एक लेखक म्हणून आपल्या करिअर सुरुवात केली. त्याने जाहिरात O & M या जाहिरात एजन्सीमध्ये काही वर्षे काम केले आहे.

- काही वर्षांपर्यंत स्क्रिप्ट रायटिंग केल्यानंतर त्याने चित्रपटांसाठी ऑडिशन देणे सुरू केले. ऑडिशननंतर, सुरुवातीला त्याला चित्रपटांमध्ये फक्त काही छोट्या भूमिका मिळू शकल्या. पण, त्याला चित्रपटात प्रमुख भूमिका साकारायची होती.

- 2010 मध्ये त्याने 'बॅन्ड बाजा बारात' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. तत्पूर्वी त्यापूर्वी त्याने तीन चित्रपट सोडले होते. 'बॅन्ड बाजा बारात' या पहिल्या चित्रपटासाठी रवीरच्या वडिलांनी आदित्य चोप्रांना पैसे दिले होते, अशी अफवा पसरली होती. तो चित्रपट आपल्याला टॅलेन्टमुळेच मिळाला असे म्हणत त्याने त्या अफवा धुडकावून लावल्या.

- रणवीरचे वडील जगजीत सिंह भवनानी दिल्लीत एक उद्योजक आहेत. ते ऑटोमोटिव्ह रिटेल्सशी संबंधित बिझनेस करतात. याशिवाय त्यांना लेदर, हॉस्पिटॅलिटी आणि मेडिकल क्षेत्रात रस आहे.

- रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंह भावनानी आहे. त्याने भावनानी हे अडनाव आवडत नसल्याने वगळले आहे. सोबतच भावनानी हे नाव खूप मोठे असल्याने ते लोकांच्या लक्षात राहणार नाही असे त्याला वाटते.

बातम्या आणखी आहेत...