आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीरसिंह सियारामचा नवा ‘ब्रँड अॅम्बेसेडर’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सियाराम सिल्क मिल्स लिमिटेडने सुपरस्टार रणवीरसिंहला ब्रँडशी जोडले आहे. ४० वर्षांच्या समृद्ध परंपरेसह सियाराम भविष्यवादी डिझाइनचा पर्याय बनला आहे. सियाराम ब्रँड जगभरातील वस्त्रोद्योगात उपस्थिती वाढवत आहे, तर रणवीरची लोकप्रियता वाढत आहे. त्याच्या शानदार बॉडीमुळे तो अनेकांचा प्रेरणास्रोत बनला आहे. यासंबंधी रणवीर म्हणाला की, “सियाराम एक प्रतिष्ठित ब्रँड आहे. मी सियारामच्या जाहिराती पाहत मोठा झाला आहे. त्यामुळे अशा ब्रँडचे अॅम्बेसेडर झाल्याने मी त्या सर्व क्षणांचा अनुभव घेत आहे. या ब्रँडने नेहमीच सर्वांना प्रेरणा दिली आहे. त्यांचे कपडे अद्वितीय डिझाइन आणि उच्च गुणवत्तेचे आहेत.’


सियारामचे सीएमडी रमेश पोद्दार यांनी सांगितले की, “आम्ही रणवीरसिंहला आमच्या ब्रँड अॅम्बेसेडरच्या स्वरूपात साइन केले असून ते सर्व क्षेत्रांत लोकप्रिय आहेत. त्यांची स्वत:ची एक शैली असून युवकांसाठी प्रेरणा आहेत. रणवीरसिंह स्पष्ट स्वरूपात आमच्या ब्रँड आणि गुणांना परिभाषित करतात. त्यांच्यासोबत आम्ही फॅशनेबल प्रवासाची अपेक्षा करत आहोत.’

बातम्या आणखी आहेत...