आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजित पवारच गटनेते, त्यांचेच व्हिप चालणार! तरी राष्ट्रवादीच्या आमदारांना बाउंसर लावून हॉटेलात डांबले जातेय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राम मंदिरला विरोध करणाऱ्या सिब्बल यांना शिवसेनेने वकील नेमले -रावसाहेब दानवे
  • राज्यातील शेतकऱ्यांना गरज असताना आमदारांना हॉटेलात डांबले जातेय - भाजप
  • संजय राउत यांना वेड लागलेय, त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा -दानवे

मुंबई- विधानसभा निवडणुकीनंतर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला आमंत्रण देण्यात आले, पण त्यांनाही सत्ता स्थापन करता आली नाही. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर धक्कादायकरित्या अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता भाजपने पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. यात त्यांनी अनेक मुद्द्यांमध्ये हात घातला. राष्ट्रवादीचे गटनते अजित पवारच आहेत, ते व्हीप काढतील ते लागू होईल, असे दानवे म्हणाले.
पत्रकार परिषदेत बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, "ज्यावेळी राष्ट्रपदी राजवट लागू झाली, तेव्हा अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना मदतीची गरज होती, राज्यपालांनी प्राथमिक स्वरुपाची मदत जारी केली. पण, ती मदत अपुरी पडत होती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही एकत्रित येण्याचे ठरवले आणि अजित पवारांसोबत मिळून आम्ही सत्ता स्थापन केली." 
" राज्यातील नुकसान पाहणीसाठी केंद्रातील पथक नुकसानीचा अंदाज घेत आहे, नुकसानीची आकडेवारी स्पष्ट झाल्यावर सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल. सध्या राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार आहेत, त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचे संमती पत्र आणले आणि त्यावरुन आम्ही सत्ता स्थापन केली आणि राज्याला आम्ही स्थिर सरकार देऊ. "


"संजय राऊतांनी आरोप केला, की राज्यपालांनी घटनात्मक डावलून सत्ता स्थापन करू दिली, पण त्यांना मी सांगू इच्छितो की, राज्यपालांनी घटनेच्या चौकटीत राहूनच संपूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे, त्यामुळे विरोधकांची कोणतीच दखल न्यायालयाकडून घेतली जाणार नाही.  संजय राऊत म्हणतात, भाजपला सत्तेच वेड लागंल आहे, पण मी म्हणतो की, राउतांनाच सत्तेचं वेड लागलंय, त्यांना रुग्णालया दाखल करण्याची वेळ आली आहे. "
" विरोधकांनी आपल्या आमदारांना हॉटेलात डांबून ठेवले आहे. पण, आमचे आमदार  आपापल्या मतदार संघात फिरत आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी समजू घेत आहेत." असे रावसाहेब दानवे म्हणाले.