आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादा, जालन्यातून एकदा आम्हाला संधी द्याच, मंत्री खोतकरांची खा. दानवेंकडे थेट मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - लोकसभेची निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर आपण ठाम आहोत. त्यासाठी जालना लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडवून घ्यावा किंवा येथून मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्यावी, अशी मागणी मी केली आहे. त्यामुळे याचा निर्णय मुंबईतून होईलच; परंतु दादा, आम्हालाही एकदा संधी द्याच, असे म्हणत शिवसेनेचे नेते तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी थेट खा. रावसाहेब दानवे यांच्याकडे जालना लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्याची मागणी केली.  


जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हेच उमेदवार असणार आहेत हे जवळपास निश्चित आहे. त्यातच युती झाली  तरी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही दानवेंविरोधात लढण्याची तयारी बोलून दाखवली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून तापलेला दानवे-खोतकर वाद अद्यापही शमलेला नाही.  आठवडाभरात दानवे-खोतकर दोन वेळा एका व्यासपीठावर आले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दोघातील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडेही एक बैठक झाली. मात्र  ठाकरे यांचा आदेश अंतिम असल्याचे सांगत खोतकर यांनी अद्यापही मैदान सोडले नसल्याचे वारंवार सांगितले आहे. रविवारी  कुंडलिका नदीवर असलेल्या शंभर वर्षे जुन्या लोखंडी पुलाच्या जागेवर नवीन पुलाचे बांधकाम करण्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात  हा मतदारसंघ आमच्यासाठी सोडा आणि दादा आम्हालाही एकदा संधी द्या, असे खोतकर यांनी दानवेंना उद्देशून म्हटले. 


आठवडाभरात दानवे-खोतकर दुसऱ्यांदा आले एकाच व्यासपीठावर
आठवड्यात दुसऱ्यांदा एकत्र : यापूर्वी २ मार्च रोजी शहरात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी महामेळाव्यात दानवे-खोतकर एकाच व्यासपीठावर आले होते. त्या वेळी त्यांनी जाहीर कार्यक्रमात गळाभेट घेतली होती. त्यानंतर रविवारी लोखंडी पुलाच्या भूमिपूजनासाठी हे दोन्ही नेते एकत्र आले. जाहीर कार्यक्रमात एकत्र आल्यानंतरही खोतकर यांनी निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले आहे. 


दानवेंचे मौन : सुभाष देशमुख यांनी जालन्यात येऊन केलेली शिष्टाई असो किंवा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेली बैठक असो. प्रत्येक वेळी मंत्री खोतकर यांनी आपण मैदान सोडले नसल्याचे जाहीरपणे म्हटले आहे. शिवाय अंतिम निर्णय उद्धव ठाकरे हेच घेणार असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत. मात्र यावर दानवे यांनी एकदाही आपली प्रतिक्रिया दिली नाही. पत्रकारांनी विचारल्यावरही आमच्यात कोणताही वाद नाही, असेच दानवे यांनी सांगितले आहे. 

बातम्या आणखी आहेत...