आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rap Up : Varun Gets Emotional After Completing Shooting 'Street Dancer 3D', Wrote 'I Am Sad Because The Shooting Completed Everyone Gets Separated '

रॅप अप : 'स्ट्रीट डान्सर 3D' चे शूटिंग पूर्ण झाल्याने वरुण झाला भावुक, लिहिले - 'मी सर्वांपासून दूर होऊन उदास आहे' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : वरुण धवन - श्रद्धा कपूरचा डान्स बेस्ड चित्रपट 'स्ट्रीट डान्सर 3D' चे शूटिंग पूर्ण झाले आहे. चित्रपटाचा मुख्य अभिनेता वरुण चित्रपटाच्या को-स्टार्सपासून दूर झाल्याने भावुक झाला आहे. आपल्या भावना त्याने साेशल मीडियावर शेअर केल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजाने केले आहे.  

 

24 जानेवारीला होईल रिलीज... 
वरुणने रॅपअपचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. 'स्ट्रीट डान्सर 3डी' पुढच्यावर्षी 24 जानेवारीला रिलीज होणार आहे. वरुणने लिहिले, "आम्ही अभिव्यक्तीसाठी डान्स करतो. इम्प्रेस करण्यासाठी नाही. म्ही हे पाहण्यासाठी खूप उत्साहित आहे की, आम्ही काय केले आहे. रेमो डिसूजा मला तुमच्या सेटवर राहाणे खूप आवडते. आमच्यासोबत हा चित्रपट बनवण्यासाठी जगभरातील सर्व डान्सर्सचे खूप खूप आभार. मी मागच्या काही दिवसांमध्ये खूप मस्ती केली आणि मी यामुळे खूप दुखी आहे की, चित्रपट पूर्ण झाला आहे. पण आता 24 जानेवारीला तुम्ही 'स्ट्रीट डान्सर्स'ना भेटणार आहात."

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#streetdancer3d 🎞 @sumit.baruah

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

 

चित्रपटात हे स्टार्स दिसणार आहेत... 
'स्ट्रीट डान्सर' रेमोच्या आधीच्या डान्स रिलेटेड चित्रपट 'एबीसीडी' आणि 'एबीसीडी 2' चीच तीसरी फ्रॅन्चायसी आहे. चित्रपटात वरुणसोबत श्रद्धा कपूर, नोरा फतेही, अपारशक्ति खुराना, प्रभुदेवा हेदेखील दिसणार आहेत.