आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rape Accused Nityanand Preaches On Social Media, Claiming To Created A Separate Country

बलात्काराचा आरोपी नित्यानंद सोशल मीडियावर देतो उपदेश, वेगळा देश स्थापन केल्याचा दावा

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

जन्म - १ जानेवारी १९७८
खरे नाव - ए राजशेखरन
शिक्षण - मेकॅनिकल इंजि. डिप्लोमा (वेल्लूर पॉलिटेक्निक कॉलेज)

स्वत:ला देव म्हणवून घेणारा वादग्रस्त धर्मगुरू नित्यानंद ऊर्फ ए राजशेखरन पुन्हा चर्चेत आला आहे. वृत्तांनुसार, नित्यानंद याने दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोरजवळ एक स्वतंत्र देश कैलासा स्थापन केला आहे. नित्यानंद याचे कायदेविषयक सल्लागार कैलासाला मान्यता देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात याचिका दाखल करणार आहेत. यापूर्वी तामिळनाडूतील एका दांपत्याने नित्यानंद याने त्यांच्या मुलींचे अपहरण केल्याचा आरोप केला होता. दांपत्याने गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांच्या मुलींची अहमदाबाद येथील आश्रमामधून सुटका करण्याची मागणी केली होती.

नित्यानंद याचा जन्म तामिळनाडूजवळ तिरुवन्नामलाईमध्ये झाला. नित्यानंद याने लहानपणापासूनच योगा, वेद, धार्मिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला असल्याचे त्याचे आत्मचरित्र लिहिणाऱ्यांनी सांगितले आहे. त्याना लहानपणापासूनच मंदिरात जाण्याची आवड होती. १२ वर्षांचे असताना नित्यानंद याने रामकृष्ण मठात शिक्षण सुरू केले होते. २००३ मध्ये अमेरिकेमधील लॉस एंजलिसमध्ये लाइउ ब्लिस फाउंडेशनची स्थापना केली. नित्यानंद ध्यानपीठम योग, ध्यान केंद्र आणि अनेक प्रकारचे फिटनेस कोर्स चालवतो. या पीठांचे अनेक देशांमध्ये मंदिरे, आश्रम आणि गुरुकुल आहेत. २०१७ मध्ये एका आश्रमात रोप योगाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. नित्यानंद याच्या जन्मतारखेवरूनही वाद सुरू आहेत. २००३ मध्ये अमेरिकन व्हिसावर १३ मार्च १९७७ जन्मतारीख लिहिलेली आहे, तर कर्नाटक उच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात १ जानेवारी १९७८ या जन्मतारखेचा उल्लेख आहे. याशिवाय त्याचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा बनावट असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. नित्यानंद याच्यावर पहिल्यांदा २०१० मध्ये आरोप झाले. सन टीव्हीवर नित्यानंद याचा सेक्स टेप प्रसारित झाला होता. यामध्ये एक दाक्षिणात्य अभिनेत्री त्याच्यासोबत होती. हा व्हिडिओ बनावट असल्याचे नित्यानंद याने म्हटले होते. मात्र यानंतर चौकशीमध्ये हा व्हिडिओ बनावट नसल्याचे स्पष्ट झाले होते. २०१२ मध्ये त्याच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप झाला होता. त्यानंतर तो पाच दिवसांपर्यंत फरार होता. पोलिसांना आत्मसमर्पण केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे

सोशल मीडियावर लाखो समर्थक
 
नित्यानंद भारतातून फरार आहे, परंतु सोशल मीडियावर तो सक्रिय आहे. त्याने स्थापन केलेल्या कैलासाच्या वेबसाइटची पनामामध्ये नोंदणी करण्यात आली आहे. ट्विटरवर त्याचे १९३१८ फॉलोअर्स आहेत, तर फेसबुकवर त्याना १० लाखांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. त्याने २७ भाषांमध्ये ५०० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली असल्याचा दावा केला आहे.

उपदेशांमुळे चर्चेत आला, पण ट्रोलही झाला
 
1. मी ठरवले तर गाय-वानर आणि वाघ संस्कृती आणि तामिळमध्ये बोलू, असे व्हिडिओमध्ये म्हणाला होता.
2. एक एका व्हिडिओमध्ये बंगळुरुमध्ये सूर्याला ४० मिनिटे उगवण्यापासून थांबवल्याचा दावा.
3. आइन्स्टाइन यांचा सापेक्षता सिद्धांत चुकीचा असल्याचे म्हणाला.
4. २०१८ मध्ये लोकांचा तिसरा डोळा उघडणार असल्याचा दावा, भिंतींच्या पलीकडेही बघू शकतील.
 

बातम्या आणखी आहेत...