वडिलांकडून पाच रुपये / वडिलांकडून पाच रुपये घेऊन दुकानात गेली होती चिमुरडी, 20 तासांनी अशा अवस्थेत सापडला मृतदेह

Oct 17,2018 11:23:00 AM IST

सूरत - रविवारीच ही चिमुरडी हसत बागडत होती.. संपूर्ण घरात तिच्या किलकलाटाने उत्साह संचारला होता..पण आता ती निपचित पडून होती.. प्लास्टीकमध्ये गुंडाळलेली.. त्याच इमारतीच्या एको खोलील. या चिमुरडीच्या वेदना इतरांना समजल्या असत्या तर त्यांना हे सर्व किती क्रूर होते ते समजले असते. एका भाडेकरूने दुसऱ्या भाडेकरूच्या साडे तीन वर्षांच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या केली. मुलीचा मृतदेह 20 तासांनी त्याच इमारतीच्या ग्राऊंड फ्लोरवरील भाडेकरूच्या बंद खोलीत आढळला. ड्रममध्ये प्लास्टीकमध्ये गुंडाळून मृतदेह ठेवला होता. मुलीची अवस्था पाहून पोलिसांचेही डोळे पाणावले. त्याच इमारतीत पहिल्या मजल्यावरील कुटुंबातील ही मुलगी रविवारी रात्रीपासून बेपत्ता होती.


आरोपी मध्यरात्री झाला फरार
हत्येचा संशय ग्राऊंड फ्लोरवर राहणाऱ्या अनिल यादव नावाच्या तरुणावर व्यक्त केला जात आहे. तो मध्यरात्रीनंतर अचानक कुलूप लावून बेपत्ता झाला. डाइंग पेंटिंग करणारा संशयित तरुण एका साथीदारासह तीन महिन्यांपासून येथे राहत होता. त्याचा साथीदार अनेक दिवसांपासून गावी गेलेला होता. मुलीचे कुटुंब 15-20 दिवसांपूर्वीच येथे राहायला आले होते. शेजारी आणि कुटुंबीय सुरुवातीपासूनच या संशयित तरुणाला खोली भाडण्याने देण्यास विरोध करत होते. यावरून घरमालक श्यामनारायण पांडेयबरोबर लोकांचे वादही झाले होते.


दुकानात गेली होती चिमुरडी
मुलीच्या आईने सांगितले की, रविवारी सायंकाळी 7:30 वाजता तिच्या मुलीने दुकानातून खाऊ आणण्यासाठी वडिलांकडे 5 रुपये मागितले होते. रात्री 8 वाजता मुलगी घरातून निघाली. एका तासानंतरही ती घरी आली नाही तेव्हा सर्वांना काळजी वाटली. आईची अवस्था पाहून लोक जमले आणि पोलिसांना माहिती दिली. रात्री 10:30 वाजता पोलिस तपास सुरू झाला.


100 पोलिसांच्या 21 टीमने 130 घरे शोधली, त्याच टीम घेताहेत आरोपीचा शोध
रविवारी रात्रीपासून 100 पोलिसांच्या 21 टीम मुलीचा शोध घेत होत्या. डॉग स्कवॉडही बोलावण्यात आले. 10 पेक्षा जास्त सीसीटिव्ही कॅमेरे तपासल्यानंतर मुलगी सोसायटीबाहेर गेलीच नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी आसपासच्या 130 घरांमध्ये शोध घेतला. सोमवारी सायंकाळी 4 वाजता त्याच घराच्या ग्राऊंड फ्लोरवर बंद असलेल्या खोलीवर नजर गेली. त्यावेळी त्याचठिकाणी आत मृतदेह आढळला.


सरकार साडे 4 लाख तर खासदार देणार 50 हजार रुपए
खासदार सीआर पाटील यांनी आरोपीला दोन दिवसांत पकडले जाईल असे आश्वासन मुलीचे आईवडील आणि स्थानिकांना दिली. त्याला कठोर शिक्षा दिली जाईल असेही सांगितले. खासदारांनी त्यांच्याकडून 50 हजार रुपये आणि सरकारच्या वतीने 4.50 लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासनही दिले.


रात्री आई आणि पोलिस आले होते पण कोणाला संशय आला नाही
रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास मुलीची आई मुलीला शोधत या खोलीत आली होती. पण तरुण अर्धनग्न अवस्थेत होता त्यामुळे ती परत गेली. दुसरीकडे रात्री 12.15 वाजता मुलीचे वडीलही त्याखोलीजवळ गेले होते. तेव्हा आरोपी लोटलेला होता. पोलिसही त्याठिकाणी आले होते, पण मृतदेह ड्रममध्ये असल्याने कोणाचीही नजर गेली नाही. प्राथमिक तपासात समोर आले की, बलात्कारानंतर मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली.

X