आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्या विरोधात ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखिका विनता नंदा यांनी दिलेल्या तक्रारीवरून अधिकृतरित्या हा गुन्हा नोंदवण्यात आला. देश-विदेशात #MeToo कॅम्पेन अंतर्गत विविध क्षेत्रातील महिला कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक शोषणावर व्यक्त होत असताना विनता यांनी आपली आपबिती मांडली. गेल्या महिन्यात त्यांनी आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सर्वांसमोर मांडला होता. विनता नंदा आरोप लावल्यानंतर अनेक सहकलाकार आणि क्रू मेंबर्स पुढे येऊन व्यक्त झाले. संस्कारी बाबूजी नावाने ओळखले जाणारे आलोक नाथ ड्रिंक करून विचित्र वर्तन करत असल्याचे अनेकांनी म्हटले होते.
तत्पूर्वी आलोक नाथ यांच्या पत्नी आपल्या पतीचे समर्थन करताना विनता नंदा यांच्या विरोधात कोर्टात गेल्या. आलोक यांच्यावर बलात्काराचे आरोप लावणाऱ्या विनता यांना माध्यमांपासून दूर राहण्याची ताकीद द्यावी असा अर्ज त्यांनी मुंबईच्या सत्र न्यायालयात केला होता. सोबतच आलोक नाथ यांनी सुद्धा आपल्यावर आरोप खोटे असल्याचे सांगताना लेखिका नंदा यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला. लेखिकेने लावलेल्या आरोपांबद्दल माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
काय आहेत विनता नंदा आणि संध्या मृदुलचे आरोप...
- तारा या चित्रपटाच्या लेखिका विनता नंदा यांनी सांगितल्यानुसार, मद्यात काहीतरी मिसळून आलोक नाथ यांनी त्यांच्यावर बलात्कार केला होता. या वादानंतर याच मालिकेत काम करणाऱ्या नवनीत निशानने देखील आलोक नाथ यांच्या वागण्याला कंटाळून मी त्यांच्या कानफटात लगावली होती असे नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे. त्यानंतर हम साथ साथ है चित्रपटातील महिला सदस्यासमोरच आलोक नाथ यांनी कपडे काढले असल्याचे या महिला क्रू मेंबरने एका मुलाखतीत सांगितले आहे.
- यानंतर संध्या मृदुलने आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संध्याने एका मालिकेत आलोक नाथ यांच्यासोबत काम केले होते. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान तिला खूप वाईट अनुभव आला होता. आलोक नाथ मला सर्वांसमोर मुलीसारखं वागवायचे, मात्र त्यांच्या संस्कारी चेहऱ्यामागे असभ्य पुरुषाचा चेहरा दडला आहे, चित्रीकरणाच्या काळात त्यांनी मला वारंवार फोन करून मानसिक त्रास दिला. माझ्या रुममध्ये येऊन असभ्य वर्तन केले असे अनेक गंभीर आरोप संध्याने केले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.