आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अहमदनगर - मारहाण करून दोघांनी बलात्कार केला असल्याची फिर्याद एका आदिवासी महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. त्यावरून पाेलिसांनी शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या महिलेला आपण ओळखतही नसून प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे भगवान फुलसाैंदर यांचे म्हणणे आहे.
भगवान, गणेश फुलसौंदर, महेश फुलसौंदर, अरुण फुलसौंदर (सर्व रा. बोरूडे मळा, नगर) व त्यांच्यासोबत असलेल्या पाच अनोळखी व्यक्ती अशा दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, १२ ऑगस्टला दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास बुरूडगाव रोडवरील पडीक रानात बकऱ्या चारत असताना भगवान फुलसौंदर यांच्यासह इतर लोक तेथे आले. तुला व तुझ्या कुटुंबीयांना आमच्यासोबत सुरू असलेला जागेचा वाद मिटवायचा आहे की नाही, असे म्हणत लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केली. मारहाणीत जखमी झाल्यानंतर अर्धवट बेशुद्धावस्थेत असताना गणेश व महेश या दोघांनी बलात्कार केला. इतर आरोपींनी घेराव घालून पोलिस स्टेशनला गेल्यास तुला व तुझ्या कुटुंबीयांना जिवे मारू, अशी धमकी दिली असल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.