आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​मुलीवर बलात्कार, आरोपीला पोलिस कोठडी, पीडिता साडेपाच महिन्यांची गरोदर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड - तालुक्यातील साकत येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मच्छिंद्र रोहिदास गवळी (१८ वर्षे) याची रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे. १८ मार्चला मच्छिंद्रने या १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. गेल्या काही महिन्यांपासून तो या मुलीवर अत्याचार करत होता. भीतीमुळे या मुलीने याबाबत कोणाला काहीही सांगितले नाही. 


मुलीच्या पोटात असहाय्य दुखू लागल्यानंतर तिच्या आईने बीड येथील एका रूग्णालयात तिला नेले. तिथे तपासणी केल्यानंतर ही मुलगी साडेपाच महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. नंतर मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलिस ठाण्यात धाव घेतली. 
मुलीने दिलेल्या जबाबानुसार संबंधित तरूणाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करून रविवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला सोळा ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव सहारे करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...