आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसआरपीएफ जवानाकडून लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावतीच्या युवतीवर राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सुनील गवई नामक जवानावर अमरावतीत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  


सुनील गवई व पीडित दोघेही नोव्हेंबर २०१७ मध्ये अमरावतीमधील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणीचा सराव करत होते. दरम्यान, त्यांच्यात प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. काही दिवसांनी सुनीलची एसआरपीएफमध्ये निवड झाली आणि तो प्रशिक्षणासाठी पुण्याजवळील दौंड प्रशिक्षण केंद्रात गेला. या ठिकाणी प्रशिक्षण सुरू असताना तो अनेकदा आपल्याला अमरावतीतून पुण्यात बोलावायचा. त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवल्यामुळे त्याच्या बोलावण्यावर विश्वास ठेवून पुण्यात जात होते. पुण्यातील सोमवार पेठेतील “ओरिएंट’ हॉटेलमध्ये त्याने आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केले, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...