Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | rape case in beed district

लग्नाच्या आमिषने महिलेवर अत्याचार; आरोपीच्या नातेवाइकांडूनही मारहाण

प्रतिनिधी | Update - Apr 23, 2019, 09:41 AM IST

पीडितेला दोन मुले झाल्यानंतर पतीने सोडून दिले होते

  • rape case in beed district

    केज - एका २६ वर्षीय परित्यक्त्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सतत पाच वर्षे अत्याचार केल्याची घटना केज शहरात घडली आहे. पीडिता लग्न कधी करणार, अशी विचारणा करण्यासाठी आरोपीच्या घरी गेली असता आरोपीच्या नातेवाइकांनी मारहाण करून तिला व तिच्या दोन मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.


    सहा वर्षांपूर्वी सदर पीडितेला दोन मुले झाल्यानंतर पतीने सोडून दिले होते. ती आपल्या माहेरी राहत असताना डिसेंबर २०१३ मध्ये आरोपी खुदूस अब्दूल वाहब इनामदार (रा. रोजा मोहल्ला, केज) याने तिला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार केले. तिने सतत लग्नासाठी तगादा लावला. मात्र आरोपीने नंतर करू असे म्हणत वेळ मारून नेली. पाच वर्षांपासून होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून पीडित महिला ही १७ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता खुदूस इनामदार याच्या घरी गेली. तिने लग्न कधी करणार आहेस, अशी विचारणा करताच आरोपीचे नातेवाइक अब्दुल रहेमान अब्दुल वाहब इनामदार, अब्दुल्ला उर्फ अब्दूल वाहब इनामदार, करिमोद्दीन अब्दुल वाहब इनामदार, राजू अब्दुल वाहब इनामदार यांनी पीडितेच्या चारित्र्याबाबत अश्लील भाषेत शिवीगाळ करीत तिला लाथाबुक्याने मारहाण केली. तू पुन्हा लग्न कर म्हणून आमच्या घरी आलीस तर तुला आणि तुझ्या दोन्ही मुलांना मारून टाकू अशी धमकी देऊन पीडितेस हाकलून दिले. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध बलात्कार, मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. उपजिल्हा रुग्णालयात पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपी फरार आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे हे करीत आहेत.

Trending