आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरे चारण्यासाठी गेलेल्या मूकबधिर तरुणीवर बळजबरीने अत्याचार; नराधम पसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज- जनावरे चारण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय मूकबधिर तरुणीवर एकाने बळजबरीने अत्याचार केल्याची घटना केज तालुक्यात उघडकीस आली. शनिवारी रात्री या प्रकरणात बाळासाहेब नवनाथ शिंदे याच्या विरोधात पीडित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  

 
पीडित तरुणीचे आई-वडील हे ऊसतोड मजूर असून बाहेर जिल्ह्यातील साखर कारखान्यावर स्थलांतरित आहेत. पीडित तरुणी ही सोमवारी शेतात जनावरे चारण्यासाठी गेली असता दुपारी १२ वाजेच्या सुमारास आरोपी बाळासाहेब नवनाथ शिंदे हा पाळत ठेवून तिच्या मागे गेला. शेतात जवळपास कोणी नसल्याची संधी साधून बाळासाहेब याने या पीडित मूकबधिर तरुणीवर बळजबरीने अत्याचार केला. घटना उघडकीस आल्यानंतर नातेवाइकांनी ऊसतोडीसाठी गेलेल्या तरुणीच्या  आई-वडिलांना ही माहिती दिली. पीडित तरुणीच्या वडिलांनी साखर कारखान्यावरून येऊन पोलिस ठाणे गाठले. शनिवारी आरोपी बाळासाहेब नवनाथ शिंदे याच्याविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...