आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'तुला भूमाता ब्रिगेडचे राज्याचे अध्यक्षपद देतो\' असे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार, श्रीरामपूरमधील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता- तुला भूमाता ब्रिगेडचे राज्याचे अध्यक्षपद देतो, असे आमिष दाखवत बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना लोणी खुर्द येथे घडली. दत्तात्रय पोपटराव खेमनर (चांडेवाडी, ता. श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक झालेली नाही. 

 

लोणी पोलिसांकडे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दीड वर्षापूर्वी माझी खेमनरशी ओळख झाली. तृप्ती देसाई यांच्याशी माझी चांगली ओळख आहे. मी तुला भूमाता ब्रिगेडचे राज्याचे अध्यक्षपद देईन, असे आमिष दाखवत तो घरी येऊ लागला. घर मालकिणीने त्याला तू इकडे येऊ नकोस असे सांगितले होते, तरीदेखील तो येत असे. नोव्हेंबरमध्ये त्याने बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार केला. त्यानंतरही अशाच प्रकारे बंदुकीचा धाक दाखवून कृत्य केले. या महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खेमनर याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. खेमनर स्वत:ला भूमाता ब्रिगेडचा जिल्हा समन्वयक समजतो. एका खासदाराचा सचिव असल्याची बतावणी तो करतो. एका पत्रकार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असल्याचेही सांगतो. 

 

बातम्या आणखी आहेत...