Police Action / माढा तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

महिला सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता आरोपीने केले कृत्य

प्रतिनिधी

Aug 02,2019 01:18:19 PM IST

माढा (सोलापूर) - माढा तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायतचे सदस्य प्रवीण ज्ञानेश्वर टोंगळे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने गुरुवारी रात्री फिर्याद दिल्याने माढा पोलिसांत रात्री उशीरा गुन्ह्याची नोंद झाली.

23 जुलै 2019 रोजी दुपारी चारच्या सुमारास चिंचोली गावातील सार्वजनिक विहिरीवर ही घटना घडली. पीडित महिलेने सांगितल्यानुसार, पीडिता गावातील शेतातील सार्वजनिक विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता प्रवीण टोंगळे हा तेथे मोटारसायकलवर आला आणि त्याने गाडी आडवी लावली. यानंतर त्याने पीडितेसोबत लज्जास्पद संभाषण केले. दरम्यान महिलेने त्यास नकार देऊन आरडाओरड केली असता त्याने अंगावरील साडी ओढून काढत पीडितेवर जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच कुणास सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किरण घोगडे हे करीत आहेत. ग्रामपंचायत सदस्याच्या या प्रकरणामुळे चिंचोली गाव चर्चेत आले असून गावात खळबळ माजली आहे.

X
COMMENT