आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवरुन संपर्कात आलेल्या 18 वर्षापूर्वीच्या प्रियकराने प्रेयसीवर केला बलात्कार, बनवली व्हिडिओ क्लिप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- फेसबुकवरुन संपर्कांत आलेल्या 18 वर्षांपूर्वीच्या प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार करत त्याची व्हिडिओ क्लिप सोशील मीडियावर टाकण्याची धमकी देत एक लाख रुपयांची मागणी केल्याची घटना चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रेयसीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. तो शिवाजी नगर अंबरनाथ ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे. विश्वनाथ वाल्हे अस प्रियकराचे नाव असून तो फरार आहे त्याचा शोध पोलिस घेत आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघे ही फेसबुक वरून संपर्कात आले होते.

 

आरोपी विश्वनाथ वाल्हे आणि पीडित 38 वर्षीय महिलेचे लग्नापूर्वी प्रेम संबंध होते. परंतु प्रेयसीचे लग्न झाले आणि ती उल्हास नगर ठाणे येथे गेली. त्यानंतर दोघांमध्ये संपर्क नव्हता. काही महिन्यांपूर्वी दोघे फेसबुकवरून संपर्कात आले दोघांनी एकमेकांचा नंबर घेत पुन्हा भेटण्यास सुरुवात केली. प्रियकर विश्वनाथ याने उल्हास नगर येथे प्रेयसीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तर चिंचवड येथे आणून प्रेयसीला गुंगीचे औषध देऊन इच्छे विरोधात शारिरीक संबंध ठेवत बलात्कार केला. याचे विडिओ चित्रीकरण करत फोटो देखील काढल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.फोटो आणि विडिओ भावाला आणि पतीला दाखवेल अशी धमकी देत एक लाख रुपयांची मागणी प्रियकराने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच पैसे न दिल्यास विडिओ आणि फोटो सोशियल मीडियावर टाकण्याची धमकी त्याने 38 वर्षीय महिलेला दिली आहे. त्यामुळे अखेर चिंचवड पोलिसात पीडित महिलेने धाव घेत तक्रार दिली आहे. फरार प्रियकराचा शोध पोलिस घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...