आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधू-वर सूचक संकेतस्थळावर ओळख झालेल्या तरुणीवर बलात्कार; पोलिसांत गुन्हा दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - विवाहविषयक संकेतस्थळावर ओळख झालेल्या तरुणीवर उस्मानाबादच्या तरुणाने साेशल मीडियावर अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी वाकड पाेलिस ठाण्यात २७ वर्षीय तरुणीने राहुल प्रकाश दास (३०, रा. परंडा, उस्मानाबाद) याच्याविराेधात तक्रार दाखल केली आहे. पीडित तरुणी व राहुल यांची वधू-वर सूचक संकेतस्थळावर ओळख झाली. दाेघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तरुणीने राहुलवर विश्वास ठेवला. हीच संधी साधून त्याने तरुणीशी शरीर संबंध प्रस्थापित केले. तसेच या वेळेचे माेबाइलमध्ये चित्रीकरणही केले.