आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंजवडीत दोन बालिकांवर बलात्कार, एकीचा मृत्यू; एका अल्पवयीन मुलासह दाेघांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी भागातील एका साखर कारखान्यात कामासाठी आलेल्या कुटुंबातील दोन १२ वर्षीय बालिकांवर बलात्काराची घटना उघडकीस आली. त्यापैकी एक मुलगी दगावली असून पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीनासह दोघांना ताब्यात घेतले आहे. 


अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दोन कुटुंबीय हिंजवडीतील संत तुकाराम साखर कारखान्यात कामासाठी आले होते. दोन्ही कुटुंबातील १२-१२ वर्षीय मुलीही त्यांच्यासोबतच राहतात. गणेश निकम व अल्पवयीन मुलगाही याच साखर कारखान्यात कामाला आहेत. बुधवारी या दोघांनी मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून निर्मनुष्य भागात नेले व बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. 


दाेघींपैकी एका मुलीवर तर या घटनेचा इतका परिणाम झाला की ती थेट काेमातच गेली. तिला कुटुंबीयांनी लागलीच रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अन्य पीडितेने धाडस करून सर्व आपबीती आईवडिलांना सांगितली. त्यावरून त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गणेश निकम आणि अल्पवयीनास ताब्यात घेतले. दरम्यान, कोमात गेलेल्या मुलीला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथेच तिची प्राणज्योत मालवली.

बातम्या आणखी आहेत...