आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फेसबूक'च्या माध्यमातून मैत्री...प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 19 वर्षीय तरुणीवर केला अतिप्रसंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस- सात ते आठ महिन्यांपूर्वी एका मुलीची आणि मुलाची मैत्री झाली होती. तद्नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आर्णी येथील एका 19 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची तक्रार पीडितेच्या आईने दिग्रस पोलिसांत दिली. तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी तीन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्णी येथील 19 वर्षीय मुलीवर कोपरा येथील आरोपी अफरोज खान फिरोज खान याने यवतमाळ, माहूर, दिग्रस तालुक्यातील वाई-मेंढी शिवारात वारंवार अतिप्रसंग केला. या कृत्यात आरोपीला मोसोंनोद्दीन उर्फ मुन्नू अन्नानउद्दीन (रा.कलगाव, ता.दिग्रस), अफजल खान अफसर खान, (रा.यवतमाळ) या दोघांनी सहकार्य केले. नंतर पीडितेने आपबिती आईला सांगितली. पीडितेच्या आईने दिग्रस पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत दिग्रस पोलिस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांनी पोलिस बापूराव दोडके, नितीन वास्टर, अरविंद कोकाटे, राजू वरटी, संतोष चव्हाण, मनोज चव्हाण यांच्यासह पोलिस ताफ्यासह कोपरा येथील आरोपीला अटक करण्यासाठी सापळा रचला. कोपरा येथून मुख्य आरोपी अफरोज खान फिरोज खान याला घरातून अटक केली. आरोपी मयनोद्दीन अन्नानउद्दीन याला दिग्रस तालुक्यातील कलगाव येथुन अटक केली. यवतमाळ येथील आरोपी अफजल खान अफसर खान याला दिग्रस डीबी पथकाने यवतमाळवरून अटक केली. या प्रकरणातील तिन्ही आरोपीला ठिकठिकाणाहून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंवी कलम 376, 342, 34 अन्वये गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक उदयसिंह चंदेल, निळकंठ चव्हाण, प्रसन्नजीत भवरे करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...