Home | Maharashtra | Pune | Rape on girl from two months in Pune 

जिवे मारण्याची धमकी देऊन तरुणीवर पुण्यात दोन महिने बलात्कार 

प्रतिनिधी | Update - Feb 14, 2019, 09:28 AM IST

सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने कुटुंबीयांना आपबीती सांगितली.

  • Rape on girl from two months in Pune 

    पुणे- निगडीतील २३ वर्षीय तरुणीला जिवे मारण्याची धमकी देत २ महिन्यांपासून बलात्कार करत असलेल्या सुरेंद्र ऊर्फ साेनू ओमप्रकाशला (३८, सारसर, रा. देहू गाव, पुणे) अटक करण्यात आली.

    तक्रारीनुसार, २८ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी पीडित निगडीत बसची वाट पाहत असताना सुरेंद्र आला व लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला कारमध्ये बसवले. दरम्यान, कॉफीत गुंगीचे औषध टाकून तिला बेशुद्ध केले आणि वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याच घटनेचा आधार घेत पीडितेला धमकावत त्याने दोन महिने तिच्यावर सातत्याने अत्याचार केला. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने कुटुंबीयांना आपबीती सांगितली. त्यानुसार सुरेंद्रवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Trending