आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजोबाच्या नात्याला काळिमा, खाऊचे आमिष दाखवत नातीवरच केला बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिडकीन - पैठणखेडा येथे आजोबाने आपल्या नातीवर सतत बलात्कार करून आजोबाच्या नात्याला काळिमा फासला.  या प्रकरणी बिडकीन पोलिसांनी आजोबाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यास गजाआड केले आहे.  पैठणखेडा येथील ६५ वर्षीय आजोबांनी आपली मुलगी व जावई घरी नसल्याचे पाहून अल्पवयीन नातीला खाऊचे आमिष दाखवत व तिला सतत धमकावत बलात्कार केला.

 

तसेच कुणाला न सांगण्याची धमकी दिली. दरम्यान, मुलीचे पोट दुखू लागले. तिला डॉक्टरकडे नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली.  याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

 

बातम्या आणखी आहेत...