आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंगीचे अौषध देत बलात्कार, चित्रीकरण करून नातेवाईक, पतीला पाठवण्याची धमकी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • चित्रीकरण डिलिट करण्यासाठी महिलेकडून घेतले पैसे

नाशिक- विवाहितेला भेटण्याचा बहाणा करत तिला संशयिताने शीतपेयातून गुंगीचे अौषध दिले. यानंतर तिच्यावर बलात्कार करत त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले व नंतर बदनामीची धमकी दाखवत ब्लॅकमेल केले. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन बाळू गिरीधर जाधव या संशयितावर इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती व पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुुसार, मार्च ते अाॅक्टोबर २०१९ या कालावधीत ओळखीचा संशयित बाळू जाधव याने भेटण्याचा बहाणा करत पाथर्डी फाटा येथील हाॅटेलमध्ये नेले. तेथे शीतपेयात गुंगीचे अौषध देत बेशुद्ध केले. शुद्ध अाली तेव्हा हॉटेलमध्ये संशयिताने बलात्कार केल्याचे समजले. याबाबत जाब विचारला असता संशयिताने हा सर्व प्रकार मोबाइलमध्ये चित्रित केल्याचे सांगितले. नकार दिला अथवा कुणाला काही सांगितले तर नातेवाईक, पतीला हे चित्रीकरण पाठवण्याची धमकी देत परिसरातील विविध हाॅटेलमध्ये नेऊन बलात्कार केला. मोबाइल चित्रीकरण डिलिट करण्यासाठी वेळोवेळी पैसे घेतले. याबाबत पोलिसांत तक्रार करणार असल्याचे पीडितेने सांगितल्यानंतर संशयिताने तुझा संसार मोडून समाजात बदनामी करतो, अशी धमकी दिली. वेळोवेळी शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ होत असल्याने पीडितेने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी धीर देत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयिताच्या विरोधात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.