आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक! अज्ञात नराधमाने केला चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आझाद चौक परिसरात राहणाऱ्या एका चार वर्षांच्या मुलीवर एका अज्ञात नराधमाने शाळेच्या परिसरात अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

 

आपल्यासोबत काय झाले हेसुद्धा या चिमुकलीला कळत नसून तो नराधम कोणता हेसुद्धा सांगता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले. तिच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पीडित मुलगी ही आझाद चौक परिसरातच राहते. ४ जानेवारीच्या दरम्यान दुपारी साडेचारच्या सुमारास शाळेच्या परिसरात असताना हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. ही मुलगी घरी परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. तिच्या पालकांनी तत्काळ सिडको पोलिस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. शुक्रवारी रात्री उशिरा पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेला आरोपींचे वर्णन करता येत नसून संशयिताचा शोध सुरू आहे.