आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाऊ देण्याच्या बहाण्याने चिमुरडीला झुडपात नेले, मारहान करून केला बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पाषाण परिसरातील साेमेश्वरवाडीत खाऊ देण्याच्या बहाण्याने तीनवर्षीय मुलीवर तिच्या अाेळखीतील तरुणाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस अाली. याप्रकरणी पाेलिसांनी शंभुकुमार दुखी राय (२१, बिहार) नामक तरुणास अटक केली अाहे. 


शनिवारी दुपारी ५.३० वाजेच्या सुमारास पीडित मुलगी घराजवळ खेळत हाेती. त्या वेळी तिच्या गावाकडील अाेळखीच्या शंभुकुमारने तिला कुरकुरे खाण्यास दिले आणि त्या भागातील वृद्धाश्रमामागील झुडपात नेले. तिथे तिला मारहाण केली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कारही केला. त्यानंतर तिला घटनास्थळी टाकून आरोपी पळून गेला. 


याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर चतु:शृंगी पाेलिसांनी अाराेपीचा शाेध घेत त्यास ताब्यात घेतले. याबाबत पुढील तपास पाेलिस निरीक्षक (गुन्हे) वैशाली गलांडे करत अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...